spot_img
महाराष्ट्रदीड कोटी ऑनलाईन घेतले; पोलीस खात्यातील चौघे निलंबित

दीड कोटी ऑनलाईन घेतले; पोलीस खात्यातील चौघे निलंबित

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्सफ कंपनीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपीकडून पोलिसांनी 1 कोटी 50 लाख रुपये ऑनलाईन स्वरूपात उकळल्याचा आरोप होत असून, या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश काढले आहेत.

ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. तपासादरम्यान, प्रमुख संशयित आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. श्रीकृष्णनगर, शिड) याला अटक करण्यात आली आहे. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने शेअर बाजारातील नुकसानीमुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करता न आल्याचे सांगितले. मात्र, पुढील खुलास्यात त्याने पोलिसांनी पैसे घेतले असल्याचा आरोप केला आहे.

भूपेंद्र सावळेने दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 जानेवारी 2025 रोजी नाशिककडे जात असताना, एलसीबीचे उपनिरीक्षक तुषार धाकराव व तीन कर्मचाऱ्यांनी त्याला लोणीजवळ अडवले. आरबीआय लायसन्सशिवाय गुंतवणूक घेतल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्याच्याकडून 1.5 कोटी रुपये मागितल्याचा धक्कादायक आरोप त्याने केला.

तसेच, आरोपीने दावा केला की, त्याला आणि त्याच्या भावांना जबरदस्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले व तेथेच एका विशिष्ट बँक खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले. ही संपूर्ण रक्कम उपनिरीक्षक धाकराव यांनी दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे तो म्हणाला. दरम्यान, या आरोपांची गंभीरता लक्षात घेता उपनिरीक्षक धाकराव, कर्मचारी मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिगारदे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोडे हे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...