मुंबई | नगर सह्याद्री:-
गणपती विसर्जनाचा सोहळा जोरदार जल्लोषात पार पडला आहे, आणि त्यानंतर आता राज्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या अखेरीस अनेक भागांमध्ये पावसाची बॅटिंग पाहायला मिळेल.
राज्यातील अनेक ठिकाणी मागील चार दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू आहेत. आगामी पाच दिवसांत काही ठिकाणी पुन्हा हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे.
सप्टेंबरच्या शेवटपर्यंत आणि २ ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये, जसे की नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर आणि कोकण, पाऊस बरसण्याची शक्यता आहे.