सुपा एमआयडीसी स्थानिकांना रोजगार द्या; पळवे खु. ग्रामस्थांची मागणी
तीन दिवसापासून करत आहे धरणे आंदोलन
आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा
पारनेर/प्रतिनिधी :
सुपा एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिला जात नाही या संदर्भात एकता ग्रुप व पळवे खु. येथील ग्रामस्थ गेल्या तीन दिवसापासून धरणे आंदोलन करत आहेत.
त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात, स्थानिकांना कामांमध्ये ८० % टक्के कायमस्वरूपी प्राधान्य मिळावे, बाहेरील ठेकेदारा ऐवजी भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे.
या मागण्या घेऊन धरणे आंदोलन सुरू होते. या संदर्भातील निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. तरी कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाला पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष विजू औटी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
यावेळी निशांत तरटे, संतोष तरटे, विनोद जाधव, सागर शेळके, संदीप गाडीलकर, सुहास शेलार, सुनिता तरटे, रावसाहेब जाधव, रोहन शेळके, बापू तरटे, गोरख जाधव, वैभव जाधव, अनिल गायकवाड, भाग्येश देशमुख, अनिल तरटे, लक्ष्मीबाई लंबाळे, संतोष दंडवते, दीपक साळवे, सोपान पवार, विकास पवार, दत्ता माळी, भाऊ घालमे, मयूर तिकोळे, आदी उपोषण स्थळी उपस्थित होते.
या उपोषणाला सुपा परिसरातील व तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या अनेक दिवसापासून कंपनी व्यवस्थापन स्थानिकांना रोजगारच देत नसल्या ने आंदोलनाचे हत्यार पळवे खु. येथील ग्रामस्थांना उपसण्याची वेळ आली आहे.
पळवे खु. येथील ग्रामस्थ गेल्या तीन दिवसापासून स्थानिक भूमिपुत्रांना सुपा एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा या संदर्भात आंदोलन व उपोषण करत आहेत त्यांच्या या आंदोलनाला मी पाठिंबा देत असून त्यांच्या सोबत आहे.
विजय औटी
(मा. नगराध्यक्ष, पारनेर)