spot_img
अहमदनगरसुजित झावरेंवर अपक्ष उमेदवारी करण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

सुजित झावरेंवर अपक्ष उमेदवारी करण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

spot_img

सुजित झावरेंवर अपक्ष उमेदवारी करण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

तिकीट कापल्याने कार्यकर्ते प्रचंड आक्रमक

पारनेर/प्रतिनिधी :
महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुजित झावरे पाटील यांचे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे तिकीट कापल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे व सुजित झावरे यांनी अपक्ष उमेदवारी करण्यासाठी कार्यकर्ते कडून दबाव आणला जात आहे. उमेदवारी जाहीर झालेले काशिनाथ दाते सर यांचे काम करण्यास कार्यकर्त्यांमधून असमर्थता दर्शवली आहे त्यामुळे सुजित झावरे यांनी अपक्ष उमेदवारी करावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या पारनेर नगर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राणीताई निलेश लंके तर महायुतीच्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून काशिनाथ दाते सर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पारनेर तालुक्याचे नेते सुजित झावरे पाटील हे महायुतीच्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे समर्थकांमध्ये असंतोष दिसून येत आहे. स्व. माजी आमदार वसंतराव झावरे पाटील व सुजित झावरे पाटील यांनी पारनेर नगर विधानसभा मतदार संघामध्ये काम करत असताना अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत विकास कामांच्या बळावर सुजित झावरे पाटील यांचे नेतृत्व तालुक्यात ओळखले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष संघटनेत स्थापनेपासून झावरे पाटील कुटुंबाचे योगदान राहिलेले आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादीने झावरे पाटील कुटुंबाला न्याय दिला नसल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये असल्याने व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा सुजित झावरे पाटील यांना उमेदवारी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे व होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सुजित झावरे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करावी अशी कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात येत आहे.
येणाऱ्या काळात सुजित झावरे पाटील यांचे राजकारण तालुक्यामध्ये टिकून राहण्यासाठी व झावरे कुटुंबाचा गट
तालुक्याच्या राजकारणात सक्रिय राहण्यासाठी अपक्ष उमेदवारी सुजित झावरे पाटील यांनी करावी अशी कार्यकर्त्यांमधून मागणी जोर धरत असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसून येत आहे. गेल्या दोन दशकापासून काशिनाथ दाते सर हे सुजित झावरे पाटील यांचे तालुक्यातील राजकीय विरोधक म्हणून काम करत आलेले आहेत. त्यांनाच महायुतीने उमेदवारी दिल्यामुळे सुजित झावरे समर्थकांमध्ये मोठा असंतोष दिसून येत आहे.
महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात जाहीर झाल्याने सुजित झावरे यांनी अपक्ष उमेदवारी करून तालुक्याला चांगला सक्षम तिसरा पर्याय द्यावा अशी मागणी सुद्धा कार्यकर्ते करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरकरांना खुशखबर! सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश; ‘या’ कामांसाठी जलसंपदा विभागाची मंजुरी

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील कुकडी डावा कालव्यावरील पुलांच्या कामांस मंजुरी देण्याचे निर्देश जलसंपदा...

खळबळजनक! मध्यरात्री घडलं भयंकर?, तोंडाला कापड बांधून आले अन्..

Ahilyanagar Crime News : पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे मंगळवारी (दि.8) मध्यरात्री घडलेल्या थरारक घरफोडीच्या...

मोठी दुर्घटना! खाली तुफान वाहणारी नदी, अन् अचानक कोसळला पूल,अनेक वाहनं गेली वाहून, नेमकं काय घडलं?

Bridge Collapse: गुजरातमध्ये बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. गुजरातच्या आणंद जिल्ह्यामध्ये महिसागर नदीवरील पूल...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी आजचा दिवस ‘लकी’..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य...