spot_img
अहमदनगरश्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

spot_img

श्रीरामपूर/ नगर सह्याद्री   

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपाल वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेल्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळले.

oppo_0

या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते.

oppo_0

मृतांमध्ये शहरातील प्रसिद्ध हॉटेल चालकाच्या मुलाचा समावेश असल्याचे समजते. ही माहिती समोर येताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

oppo_32

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनाचा ताबा सुटणे हे प्राथमिक कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...

बिबट्या ठार मारा; तरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार, खारे कर्जुने ग्रामस्थांचा गाव बंदचा निर्णय

खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला...