श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात भाजप ने पहिल्या यादीत आमदार बबनराव यांच्या पत्नी प्रतिभाताई पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली पण ही राजकीय खेळी विरोधकांच्या लक्षात आली नाही व या मतदारसंघात भाजप ने विरोधकांना मास्टर स्ट्रोक दिला असून विक्रमसिंह यांच्या रुपाने तरुण चेहर्याला संधी दिली आहे.
आमदार बबनराव पाचपुते यांनी २०१४ ला भाजप मध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यावेळी त्यांना विधानपरिषदेचे आमदार करत असताना देखील पाचपुते यांनी स्पष्ट शब्दात नकार देत मी जनतेतील नेता आहे मला मागच्या दाराने सदस्य नको असे नेतृत्वाला सांगितले व पुन्हा २०१९ जनतेला सामोरे गेले व आमदार झाले दरम्यान च्या काळात आजारपणाने आ. पाचपुते यांना गाठले पण त्यांची कमतरता विक्रमसिंह पाचपुते यांनी मतदारसंघात जाणवू दिली नाही सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात राहून तालुक्यातील विकासकामे करण्यासाठी निधी मिळवत राहिले आज मतदारसंघात जवळपास एक हजार कोटींचे विकासकामे झाली यात विक्रमसिंह पाचपुते यांचा मोठा वाटा आहे.. त्यामुळे आमदार नसताना विकासकामे करण्यासाठी निधी आणण्याची हातोटी विक्रमसिंह यांच्या कडे असल्याने भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान प्रतिभाताई पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांना निवडणूक सोपी वाटु लागली होती पण ही उमेदवारी ही उमेदवारी विक्रमसिंह यांनाच ठरलेली होती. भाजप नेत्यांनी अतिशय सस्पेन्स ठेवून विरोधकांना मास्टरस्टोक देण्यात भाजप यशस्वी झाली आहे.
विक्रमसिंह यांची वाढती लोकप्रियता ही विरोधकांना भितीची वाटत आहे आज तरुण वर्ग विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडे आकर्षित आहे.