PM-KISAN: देशातील ९.७ कोटी शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत २०वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे. या हप्त्याअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ₹२००० मिळणार आहेत. एकूण २०,५०० कोटी रुपयांचा निधी या वाटपासाठी जाहीर करण्यात आला आहे.
याआधी योजनेचे एकूण १९ हप्ते वितरित करण्यात आले आहेत, आणि हा २०वा हप्ता शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सरकारकडून वेळेवर दिला जात आहे. पैसे आले की नाही, असे करा तपासणी शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता मिळाल्याची खात्री करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत:
ऑनलाइन तपासणी पद्धत:
https://pmkisan.gov.in या पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मेन्यूमध्ये ‘Beneficiary Status (लाभार्थी स्थिती)’ या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खात्याशी लिंक असलेली माहिती टाका.
‘डेटा मिळवा (Get Data)’ वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस दिसेल – जमा झालेले हप्ते, तारीख, आणि ट्रान्सॅक्शन क्रमांक.
बँकेच्या माध्यमातून तपासणी:
बँकेच्या अधिकृत मोबाईल अॅपमध्ये लॉगिन करून ट्रान्झॅक्शन तपासा.
जवळच्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री करून खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे पाहता येईल.
SMS अलर्टद्वारेही बँकेतून हप्ता जमा झाल्याचा मेसेज मिळेल.
काय आहे पीएम किसान योजना?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची योजना असून त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर वर्षी ₹६,००० ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये (₹२,००० प्रत्येकी) थेट बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.