spot_img
ब्रेकिंगशनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात घेतला गळफास

शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात घेतला गळफास

spot_img

शनिशिंगणापूर । नगर सहयाद्री
शनैश्वर देवस्थानचा कंत्राटी कर्मचारी शुभम विजय शिंदे (वय २२, रा. बेल्हेकरवाडी, ता. नेवासा) याने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी आत्महत्या केली. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.

शुभम शिंदे त्याच्या आई-वडिलांना एकुलता होता. तसेच तो अविवाहित होता. शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये तो खाजगी कंत्राटी कर्मचारी (वॉचमन) म्हणून कामाला होता. गोशाळा, मंदिर परिसर, भक्तनिवास आदी विभागात आलटून-पालटून त्याने कामे केली. सध्या दहा दिवसांपासून तो कामावर जात नव्हता.

दरम्यान, शुभम शिंदे याचे आईवडील हे शेतात कामाला गेले होते. घराच्या वरच्या पत्र्याच्या खोलीत त्याने गळफास घेतला. शेजारील मुलांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी ही माहिती परिसरातील नागरिकांना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. शुभमने बुधवारी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांपूर्वी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

यासंदर्भात दत्तात्रय आप्पासाहेब शिंदे (रा. बेल्हेकरवाडी) यांनी सोनई पोलिस ठाण्यात खबर दिली. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंदे याच्या मृतदेहाचे नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा बेल्हेकरवाडी येथे त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये राडा! १५ जणांच्या टोळक्याचा तरुणावर गँगस्टर हल्ला; सीसीटीव्हीत प्रकार झाला कैद!, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात जुन्या कोर्ट प्रकरणातील वैरातून अन्सार रहीम...

पत्नीचा कुर्‍हाडीने घेतला जीव! भल्या पहाटेच शहरात भयंकर प्रकार..

संगमनेर | नगर सहयाद्री :- तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा...

माणिकराव कोकाटे यांना ‘धक्का’!; राज्याला मिळाले नवे कृषीमंत्री, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अखेर फेरबदल झाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील होणार घाटा; तुमच्या राशीत काय? वाचा सविस्तर

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया...