spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादीच्या आंदोलनात आत्मदहनाचा प्रयत्न; अहिल्यानगर जिल्ह्यात चाललंय काय?

राष्ट्रवादीच्या आंदोलनात आत्मदहनाचा प्रयत्न; अहिल्यानगर जिल्ह्यात चाललंय काय?

spot_img

पाथर्डी । नगर सहयाद्री
पाथर्डी नगरपरिषदेमार्फत शहरात सुरू असलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची व अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आदोलनकर्त्य रोहित पुंड यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

बुधवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता हे आंदोलन पार पडले. आंदोलकांनी उपनगरे व बाजारपेठेतील नागरिकांकडून भीक मागत, ढोल-ताशांच्या गजरात पालिका कार्यालयावर मोर्चा नेला. कार्यालयात पोहोचल्यावर प्रशासनाशी चर्चा सुरू असतानाच रोहित पुंड यांनी अचानक आपल्या खिशातून पेट्रोलची बाटली काढून स्वतःच्या अंगावर ओतली व आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मात्र, घटनास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखले व संभाव्य अनर्थ टळला. या घटनेने काही वेळ पालिका कार्यालयात मोठी खळबळ उडाली. मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते बंडू पाटील बोरुडे यांनी फोनद्वारे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाला धारेवर धरले.

चर्चेनंतर प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बंडू पाटील बोरुडे, योगेश रासने, देवा पवार, सोमनाथ पाटील माने, अतिश निराळी, दत्ता सोनटक्के, सागर विधाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांनी प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...