spot_img
अहमदनगरराणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

spot_img

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदान शिबिराला प्रतिसाद

पारनेर/प्रतिनिधी :
जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंकेे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदार शिबिरास कर्जुलेेहर्या व पोखरी येथे मोठया उत्साहात प्रारंभ झाला. दि.१९ ते २९ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य यज्ञामध्ये महिलांचा ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्जुले हर्या व पोखरी परिसरातील गावांमधील शिबिरात महिला तसेच पुरूषांनी सहभाग नोंदविला. कर्जुले हर्या व पोखरी येथे शिबिरांना प्रारंभ झाल्यानंतर राणीताई लंके यांनी दोन्ही ठिकाणी भेटी देऊन महिला तसेच रक्तदात्यांची भेट घेऊ विचारपुस केली. दुपारच्या वेळी खा. नीलेश लंके यांनीही दोन्ही ठिकाणी भेटी देऊन माहीती घेतली. दोन्ही ठिकाणी रक्तदाते तसेच तपासणी करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
यावेळी दिपक लंके, बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे, उपसभापती बापूसाहेब शिर्के, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, सुवर्णा धाडगे, रा. या. औटी, प्रवक्ते मोहनराव रोकडे, अ‍ॅड. राहुल झावरे, सरपंच प्रकाश गाजरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, जिल्हा युवक उपाध्यक्ष रवींद्र गायखे, संदीप चौधरी, महेंद्र गायकवाड, चंद्रभान ठुबे, डॉ. दीपक आहेर, लकी कळमकर, रविंद्र राजदेव, अशोक आंधळे, बबन आंधळे, शशीकांत आंधळे, दत्ता येवले, पर्वती चिकणे, बापू ठुबे, शंकर कासुटे, मंगेश आंधळे, मनोज शिंदे, राजेंद्र तराळ, छाया कोकाटे, स्वाती उंडे, भागुजी झावरे, बबलू झावरे, प्रसाद नवले, अमोल उगले, दत्तात्रय साळुंके, बाबू आंधळे, सतीश पवार, बाळासाहेब शिंदे, जयराम आहेर, पांडूरंग आहेर, नवनाथ मोरे, धनंजय गुंजाळ, अविनाश मोरे, भाऊसाहेब कोकाटे, संजय काशीद, भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.

 

महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेऊन राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य यज्ञ २०२४ हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना लाभ होणार आहे. या शिबिराचा लाभ तालुक्याच्या गावांमध्ये महिलांना मिळाला पाहिजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे त्यासोबत विमा कवचाचा लाभ दिला जातोय

प्रकाश गाजरे
(सरपंच, म्हसोबा झाप ग्रामपंचायत)

——–

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात राणीताई निलेश लंके यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी चांगले काम सुरू आहे. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे हे लक्षात घेऊन राणीताई लंके यांनी पूर्ण मतदारसंघांमध्ये व कर्जुले हर्या परिसरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले हा उपक्रम महिलांच्या हितासाठी नक्कीच चांगला आहे.

स्वाती उंडे (कर्जुले हर्या)

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...

अजित पवारांचं ठरलं; किती जागांवर केला दावा पहा…

विद्यमान आमदारांनाच तिकीट | ७० हून अधिक जागांवर दावा मुंबई | नगर सह्याद्री आगामी विधानसभा निवडणुकीसाठी...