spot_img
ब्रेकिंगराज्य तिहेरी संकटात! ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

राज्य तिहेरी संकटात! ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

spot_img

Weather Update: महाराष्ट्रामध्ये सध्या हवामानाचा तिहेरी खेळ सुरू आहे. एकीकडे विदर्भ उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत असून, तापमान ४१ अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे, तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातच काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीचा गंभीर इशारा हवामान विभागानेदिला आहे. यामुळे राज्यातील नागरिक, विशेषतः शेतकरी वर्ग, मोठ्या चिंतेत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज (२ एप्रिल) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाकडून या तिन्ही विभागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे या भागांमध्ये हवामानाची स्थिती गंभीर असू शकते आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. जोरदार वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्याच्या उर्वरित भागांमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. हवामान विभागाने विशेषतः नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, पुणे, सातारा, अमरावतीआणि चंद्रपूरया जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढील २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. याचा परिणाम म्हणून गारपीट आणि जोरदार पाऊस अपेक्षित आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दक्षिणेकडील कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पावसाळी वातावरणाच्या अगदी उलट परिस्थिती विदर्भात आहे. विदर्भात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४१ अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली आहे. अशाप्रकारे, एकाच वेळी राज्यात गारपीट, वादळी पाऊस आणि तीव्र उष्णतेची लाट असे तिहेरी संकट निर्माण झाले आहे, ज्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...