spot_img
महाराष्ट्रराज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ऐतिहासिक निर्णय!

राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ऐतिहासिक निर्णय!

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या पाच पवित्र तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथमच पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय राज्याच्या धार्मिक पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

भीमाशंकर (पुणे) – व्ही. राधा (अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग), घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर) – बी. वेणुगोपाल रेड्डी (अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग), त्र्यंबकेश्वर (नाशिक) – सौरभ विजय (प्रधान सचिव, वित्त विभाग), औंढा नागनाथ (हिंगोली) – रिचा बागला (प्रधान सचिव, वित्त विभाग), परळी वैजनाथ (बीड) – आप्पासाहेब धुळाज (सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग) हे अधिकारी नियमितपणे आपल्या संबंधित तीर्थक्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेऊन, त्याचा अहवाल थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करणार आहेत.

या योजनांमधून प्रवासी सुविधा, रस्ते विकास, पाणी व स्वच्छता, सौंदर्यीकरण, भक्तनिवास व इतर पूरक प्रकल्प राबवले जाणार आहेत. राज्य शासनाने प्रत्येक ज्योतिर्लिंगासाठी स्वतंत्र उच्चपदस्थ अधिकारी नेमण्याचा निर्णय प्रथमच घेतला असून, या निर्णयामुळे कामांना वेग मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधांचाही मोठा लाभ होणार आहे.

5 ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी मंजूर निधी
भीमाशंकर – 148.37 कोटी
घृष्णेश्वर – 156.63 कोटी
त्र्यंबकेश्वर – 275 कोटी
औंढा नागनाथ – 15.21 कोटी
परळी वैजनाथ – 286.68 कोटी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला रक्तबंबाळ केलं; कारण काय?

Crime News: एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संतापाच्या भरात प्रियकरानं प्रेयसीच्या गळ्यावर चाकू...

…नगरमधील गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय; एका रात्रीसाठी ६ हजार; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Crime News: गुवाहाटीतील जोया नगर परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश...

श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानात तर्फे श्रावण मासानिमित्त भव्य कार्यक्रम

महाद्वार मिरवणूक । कुस्त्यांचा हागामा पारनेर । नगर सहयाद्री: पिंपळगाव रोठा येथील लाखो भाविकांचे...

अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी ‘उडान प्रकल्प’चा निर्धार

पारनेर तालुक्यात कार्यशाळा; १५ ऑगस्टला 'बालविवाहमुक्त गाव' ठराव संमत होणार पारनेर । नगर सहयाद्री बालविवाहासारख्या...