spot_img
अहमदनगरमाधवराव लामखडे यांची पुन्हा घरवापसी; शरद पवारांची बारामतीत भेट

माधवराव लामखडे यांची पुन्हा घरवापसी; शरद पवारांची बारामतीत भेट

spot_img

माधवराव लामखडे यांची पुन्हा घरवापसी; शरद पवारांची बारामतीत भेट

महायुतीच्या ऐक्याला आठ दिवसातच तडा

पारनेर/प्रतिनिधी :
शरद पवार यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे महाविकास आघाडीतून महाआघाडीमध्ये सहभागी झालेले नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे मा. सदस्य माधवराव लामखडे यांनी आठच दिवसांत काडीमोड करत पुन्हा घरवापसी केली. बारामतीमध्ये घडलेल्या नाटयमय घडामोडीत लामखडे यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करत राणी लंके यांच्या प्रचारात सहभागी होण्याची घोषणा बारामतीमध्ये केली.
विधानसभेची सार्वत्रीक निवडणूक जाहिर झाल्यानंतर महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला या विषयावर महिनाभर खल झाला. अखेर जागा राष्ट्रवादीकडे असल्याने खा. नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना उमेदवारी जाहिर झाली. या उमेदवारीसाठी नगर तालुक्यातील मातब्बर नेते, जिल्हा परिषदेचे मा. सदस्य माधवराव लामखडे हे इच्छुक होते. लामखडे यांनी शरद पवार यांची भेट घेउन उमेदवारी हवी अशी मागणीही केली होती, मात्र पवार यांच्यासह महाविकास आघाडीने केलेल्या सर्वेक्षणानुसार राणी नीलेश लंके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला होता.
शरद पवार यांचा निर्णय न रूचल्याने माधवराव लामखडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करत उमेदवारीची मागणी केली होती. तिथेही त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. मात्र अजित पवार यांनीही त्यांना उमेदवारी नाकारली. लामखडे यांनी मंगळवारी स्वतःचा अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र जनतेचा कानोसा घेतल्यानंतर शरद पवार हेच महाराष्ट्राचे हित जोपासणार ही भावना लक्षात आल्यानंतर खा. नीलेश लंके यांच्या माध्यमातून आपण बारामती येथे खा. शरद पवार यांची भेट घेत पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व राणी लंके यांच्या प्रचारात सक्रीय होण्याचा निर्णय जाहिर केल्याचे लामखडे म्हणाले.

लामखडे यांची भूमिका चुकीच्या पध्दतीने मांडली
नगर तालुक्याचे नेते माधवराव लामखडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्या विचारधारेवर काम करून पक्षाचे ध्येय धोरणे घराघरात पोहचविलेली आहेत. आजच्या शरद पवार साहेबांच्या भेटीत अनेक राजकीय चर्चा झाल्या. यावेळी लामखडे यांनी पारनेर-नगर मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्क्याने विजयी करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. मधल्या काही कालावधीत माधवराव लामखडे यांच्याविषयी समाजात समज,गैरसमज पसरविण्यात आले होते, चुकीच्या पध्दतीने त्यांची भूमिका मांडण्यात आली.
खा. नीलेश लंके (अहिल्यानगर दक्षिण)

फक्त बैठकीसाठी गेलो !
आमचे नेते शरद पवार यांची आज बारामती येथे खा. नीलेश लंके यांच्यासमवेत गोविंद बागेत भेट झाली.राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे, व होतोही, दोन तिन आठवडयांपूर्वी माझ्यासह काही नेते मंडळींनी अजितदादांकडे जाऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला. माझ्याकडून अनावधानाने ती गोष्ट घडली. मुंबईस जाताना अजित पवार यांच्याशी बैठक आहे असे सांगण्यात आले होते, पक्षात प्रवेश आहे असे काहीही सांगण्यात आले नव्हते.
माधवराव लामखडे
मा.सदस्य जि प नगर

नगर तालुक्याची लेक आमदार होणार !
पक्षाच्या उमेदवार राणी लंके या नगर तालुक्यातील अरणगांव येथील कन्या आहेत. नगर – पारनेर असा भेदभाव राहण्याचे काहीच कारण नाही. तसा कोणीही बुध्दीभेद करण्याचे कारण नाही कारण नगर तालुक्याची लेक आपल्या मतदारसंघाची आमदार होणार आहे.
माधवराव लामखडे
मा. जि प सदस्या

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; राहुल गांधीचं मिशन महाराष्ट्र

यादीत राहुल गांधी-सचिन पायलटसोबतच कन्हैया कुमारचेही नाव मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार...

भांडणे लावून स्वतःची डाळ शिवजून घेणार्‍यांचा धंदा बंद करण्याची आता वेळ ; दाते काय म्हणाले नेमकं पहा

पाच वर्षांपूर्वीची चूक सुधारण्याची संधी; काशीनाथ दाते यांचे प्रतिपादन | पारनेर येथे लाल चौकात...

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; डॉक्टर म्हणाले…

  जालना | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाविकासआघाडी विरुद्ध...

चंद्रशेखर घुले ठरणार जायंट किलर!; जातीपातीच्या भिंतींचे गणित बदलणार

राजळे, ढाकणे यांच्या विरोधात मतदारसंघात सुप्त लाट |  शेवगाव | नगर सह्याद्री जातीपातीच्या गणितात राजकीय पोळी...