माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे
काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून मताधिक्य देणार
नगरसेवक पै. युवराज पठारे यांनी पत्रकार परिषद घेत केली भूमिका स्पष्ट
पारनेर/प्रतिनिधी :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घटना घडत आहेत. विखे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक पै. युवराज पठारे हे महाविकास आघाडी मध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नगरसेवक पठारे यांनी पारनेर येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी पै. युवराज पठारे म्हणाले मी पारनेर नगरपंचायत चा नगरसेवक असून आमचे पठारे कुटुंब गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यात व पारनेर शहराच्या राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहे. आम्ही विखे कुटुंबाशी बांधील असून मी माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब समजतो हीच आमची ओळख आहे. मी माझ्या घरगुती वैयक्तिक कारणामुळे सध्या सक्रिय राजकारणामध्ये नव्हतो त्यामुळे माझ्याबाबत माध्यमांमध्ये विविध चर्चा व प्रतिक्रिया निर्माण झाल्या त्या अनुषंगाने मी पत्रकार परिषद घेत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये मी महायुतीच्या उमेदवारा बरोबरच आहे. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते सर यांना पारनेर शहरांमधून भरगोस मताधिक्य देणार आहे. असे नगरसेवक पै युवराज पठारे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले यावेळी बोलताना ते पुढे असे म्हणाले की पारनेर तालुक्यामध्ये माझा मोठा मित्रपरिवार आहे तसेच आमचे पाहुणे नातेवाईक यांना सुद्धा संपर्क करून काशिनाथ दाते सर यांनाच मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देणार असून महायुतीचा हा उमेदवार मोठ्या मताधिक्याने पारनेर तालुक्यात निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या पुढील काळात पारनेर शहराच्या विकासासाठी व प्रामुख्याने पारनेरच्या पाणी योजने संदर्भात काम करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक पै. युवराज पठारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
पारनेर येथे पत्रकार परिषद घेऊन नगरसेवक पठारे यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते सर यांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी होत काम सुरू केले आहे. पारनेर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर नगर विधानसभेचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते सर भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे भाजपा पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे लाडकी बहीण योजना समितीचे तालुका अध्यक्ष सुनील थोरात, नगरसेवक पै युवराज पठारे, नगरसेवक नवनाथ सोबले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पठारे, नगरसेवक अशोक चेडे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, भाजपा तालुका खजिनदार किरण कोकाटे, दूध संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार सरपंच लहू भालेकर भाजप नेते संतोष शेलार, सागर मैड, शिवसेना शिंदे गटाचे पारनेर शहर प्रमुख राजेंद्र ठुबे, आरपीआयचे पारनेर शहराध्यक्ष प्रदीप नगरे, संदीप घोडके-औटी, संजय मते, सुनील म्हस्के बाळासाहेब देशमाने, भिमाजी औटी, विकास रोकडे, अमोल रोकडे, संतोष शिंदे, रवींद्र गागरे, धनंजय ढोकळे, मनीषा पठारे सुवर्णा औटी, रोहिदास शेरकर, सचिन तराळ, संभाजी कोल्हे, भूषण देशमाने, शुभम कुलट, प्रवीण पठारे, यशवंत पठारे, सुहास औटी, स्वप्नील औटी, संदीप सोबले, निहाल काळे, मंगेश कानडे, हरिभाऊ ठाणगे, पांडुरंग औटी, कचरू औटी, ज्ञानेश्वर सोबले, प्रवीण चव्हाण, स्वप्निल कावरे, मनोज बोरुडे, स्वप्निल देशमाने, संजय कुलट, अनिल चौगुले, गोरख चौधरी, संतोष ठाणगे, प्रवीण भिसे, छबन औटी, सुजित खोसे, नामदेव उचळे, गोरख शिंदे, अरुण गागरे, कृष्णकांत खामकर सर आदी महायुतीचे कार्यकर्ते पै. युवराज पठारे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.