पाथर्डी | नगर सह्याद्री
सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी जिल्ह्यात 24.8 मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात सरासरी 350 मिलीमिटर पाऊस झाला आहे. दरम्यान, धुवाँधार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
गेल्या तीन-चार दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात दमदार परतीचा पाऊस होत आहे. पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. सोमवारी नगर, पारनेर, पाथड, श्रीरामपूर, राहत्यात जोरदार पाऊस झाला. अनेक घरांची नुकसान झाली. तरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. सोमवारी नगर 34.4, पारनेर 46, पाथड 54.8, नेवासा 20.2, राहुरी 32.9, श्रीरामपूर 65.1, राहाता 30.8 मिलीमिटर पाऊस झाला. यापूर्वी कधीही झाला नाही असा पाऊस मागील दोन दिवसात झाल्याने मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल. स्थायी आदेशा प्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.
परंतू मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.पाथर्डी तालुक्यात एकूण 49 हजार हेक्टर क्षेत्रावरील 69 हजार शेती पिकांचे नूकसान झाले असून, 34 गाय, 250 कोंबड्या शेळी 50 करडू, 26 घरांची पडझड झाली असल्याचे सांगून राजू शिवाजी सोळंके हा 39 वर्षाचा इसम देवळाली नदीत व गणपत हरीभाऊ बर्डे हे 65 वर्षाचे गृहस्थ टाकळी मानूर तलावात वाहून गेल्याची घटना घडली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. ढगफुटीचाच प्रकार म्हणावा लागेल. ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या गावातील प्रत्येक जुन्या जेष्ठ लोकांनी असा पाऊस कधी पाहीलाच नव्हता. सुदैवाने यामध्ये मनुष्यहानी झाली नाही.असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की नदी ओढे नाले यांचे प्रवाह बदलल्यामुळेच पाण्याचे प्रवाह नागरी वस्तीत आले. या भागात झालेली अतिक्रमण ही सुध्दा झालेल्या नूकसानीची कारण आहेत. भविष्यात असे प्रसंग पुन्हा निर्माण होवू नयेत म्हणून अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यानंतर तातडीने सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आणि त्यांच्य प्रशासनातील सर्व विभागांनी वेळीच योग्य निर्णय घेवून केलेल्या उपाय योजनामुळे नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात मोठे यश आले. पूर परीस्थिती ओसरल्यानंतर झालेल्या नूकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. पूर परीस्थीती पाहाता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालकमंत्री यांनी पाथड तालुक्यातील करंजी तिसगाव कासार पिंपळगाव या गावात झालेल्या नूकसानीची पाहाणी करून नागरीकांना दिलासा दिला. जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे स्वप्निल काळे, सायली पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
10 महसूल मंडलांत अतिवृष्टी
सोमवारी श्रीरामपूर, पाथर्डी, पारनेर, नगर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. टाकळी 66.3, पळशी 76.8, पाथर्डी 83.8, माणिक दौंडी 83.8, टाकळी 72, खरवंडी 72, श्रीरामपूर 68.3, बेलापूर 65.3, टाकळीभान 71 व कारेगाव 71 मिलीमीटर पाऊस झाला.
पुढील पाच दिवस पाऊस
गेल्या तीन-चार दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात पाऊस जोरदार बँटिंग करत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने सांगितल्यानुसार अजून पाच दिवस जिल्ह्यात वादळी वार्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 16 ते 19 सप्टेंबर पर्यंत वादळी वार्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस तर 20 सप्टेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस सांगितला आहे.