लोणी । नगर सहयाद्री :-
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली.शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा झाली.
जरांगे यांच्यावर उपचार करणार्या डाॅक्टरांकडून त्यांनी त्यांच्या तब्येतीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहीती घेतली. आ.विठ्ठलराव लंघे याप्रसंगी उपस्थित होते.शासनाने घेतलेल्या निणर्याच्या संदर्भात मंत्री विखे पाटील आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली. शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना मराठवाड्याची मन जिकंण्याची संधी सरकारला असल्याची भावना जरांगे यांनी बोलून दाखवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे निर्णय होवू शकला.त्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी कायम सकारात्मकता दर्शवली.गावपातळीवर प्रमाणपत्र देण्यासाठी नेमलेल्या समितीच्या कार्यपध्दती ठरविण्याबाबत जिल्हाधिकरी यांना बोलावून बैठक घेणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.