spot_img
अहमदनगरभूमिपुत्रांच्या उपोषणाकडे राजकीय पुढाऱ्यांची पाठ

भूमिपुत्रांच्या उपोषणाकडे राजकीय पुढाऱ्यांची पाठ

spot_img

भूमिपुत्रांच्या उपोषणाकडे राजकीय पुढाऱ्यांची पाठ

प्रशासकीय अधिकारी सुद्धा फिरकलेच नाहीत

पाण्याच्या प्रश्नावर पारनेर तहसीलवर सुरू आहे उपोषण

उद्यापासून आमरण उपोषणाचा निर्णय

पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे या प्रमुख मागण्यांच्या संदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तहसील कार्यालय पारनेर येथे उपोषणाला मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी बसले आहेत. परंतु गेल्या तीन दिवसापासून त्यांच्या उपोषणाकडे तालुक्यातील राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
उपोषणकर्ते भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर म्हणाले की पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका गेल्या पन्नास वर्षापासून पारनेर तालुक्यात पाणी प्रश्नावर विविध आंदोलने झाली निवडणुकांमध्ये फक्त तालुक्याचा पाणी प्रश्न राजकीय पुढार्‍यांना आठवतो परंतु पारनेर तहसील वर गेल्या तीन दिवसापासून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे तरीही तालुक्यातील कोणताच राजकीय पुढारी उपोषणाकडे फिरकलाच नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभा इतर निवडणुकांमध्ये राजकीय पुढार्‍यांना आता जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे अजून पर्यंत प्रशासनाने सुद्धा उपोषणाची दखल घेतली नाही ही मोठी शोकांतिकाच आहे पारनेरच्या पाणी प्रश्नावर आम्ही लढा उभारला आहे आणि हा लढा असा सुरू ठेवणार आहे.

पारनेर येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेने उपोषण सुरू केले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, अशोक आंधळे तालुकाध्यक्ष मनोज तामखडे, जिल्हा संघटक संतोष वाबळे, बाळशिराम पायमोडे, नंदू साळवे, रघुनाथ मांडगे, रावसाहेब झांबरे, सुदाम झावरे, संजय भोर, कारभारी आहेर, सुभाष ठुबे, वसंत साठे, अमोल रोकडे, शिवम पवार, शुभम टेकुडे, बाबासाहेब वाडेकर, दत्ता फटांगरे, अंकुश पायमोडे, देवराम कुदळे, सुभाष करंजुले, विशाल पायमोडे, संजय भोर, आदी कार्यकर्ते पाणी प्रश्न संदर्भात पारनेर तहसील कार्यालयावर उपोषणाला बसले आहेत.

यासाठी सुरू आहे उपोषण…

पश्चिम वाहिन्यांचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळवून नगर जिल्हयातील दुष्काळी भगाला देण्यात यावे, कान्हूरपठार, पुणेवाडी, जातेगांव, राळेगणसिध्दी, शहाजापुर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वीन कराव्यात, डिंबे माणिकडोह बोगद्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, अटी, शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या, नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे ५० हजारांचे अनुदान ठराविक शेतकऱ्याऱ्यांना मिळाले, उर्वरीत शेतकऱ्यांना ते मिळावे. यासंबंधीच्या मागण्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...