spot_img
महाराष्ट्रभारतातील एक हजार पर्यटक नेपाळमध्ये अडकले; महाराष्ट्रातील 'इतक्या' पर्यटकांचा समावेश, वाचा यादी..

भारतातील एक हजार पर्यटक नेपाळमध्ये अडकले; महाराष्ट्रातील ‘इतक्या’ पर्यटकांचा समावेश, वाचा यादी..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री: –
नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‌’जेन झी‌’ आंदोलकांनी धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला आता हिंस्त्रक वळण आले आहे. संतापलेल्या आंदोलकांनी पंतप्रधान ओली यांचं घर जळालं आहे. या घटनेने ओली यांनी देश सोडून पलायन केल्याची घटना घडली. दरम्यान नेपाळमध्ये अराजकाची स्थिती असून भारतातील एक हजार पर्यटक येथे अडकले आहेत.

नेपाळच्या सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने नेपाळ येथील तरुणाई संतापली. संतप्त झालेल्या तरुणाईने रस्त्यावर येऊन निदर्शने केली. या आंदोलनाला आटोक्यात आणण्यासाठी तेथील सुरक्षारक्षकांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक तरुणांचा गोळ्या लागून जीव गेला. या घटनेनंतर संतापलेल्या तरुणाईने पिछेहाट न करता सरकारच्या निर्णयाविरुद्ध लढा दिला. आणि अखेर सरकारने सोशल मीडियावरची बंदी उठवली. असे असले तरी अद्यापही नेपाळ मध्ये अराजकाची परिस्थिती कायम आहे.

या परिस्थितीत नेपाळमध्ये संचारबंदी लागू केल्याने भारतातले अनेक नागरिक अडकले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील पर्यटकांचा समावेश आहे. तर पुणे आणि मुंबईमधील 23 जेष्ठ नागरीक नेपाळमध्ये अडकले आहेत. हे सर्व नागरिक पर्यटनाच्या हेतूने गेले असल्याची माहिती मिळाली आहे. या नागरिकांना मायदेशात कसे परतायचे हा प्रश्न पडला आहे. या पार्श्वभूमीवर भारतवासियांनी मायदेशी परतण्यासाठी भारत सरकारला व्हिडिओद्वारे विनंती केली आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन वरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरुप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पर्यटकांना दिली. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान जेन झीच्या आंदोलनामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे काठमांडू शहरातील विमानतळही बंद ठेवण्यात आले आहे. काठमांडूमधून पर्यटकांचा एक समूह बुधवारी मुंबईत परतणार होता. मात्र विमानतळ बंद असल्याने हे पर्यटक काठमांडूवरून विमानतळ सुरु झाल्यास रवाना होतील.

महाराष्ट्रातील अडकलेल्या
नागरिकांची संख्या
अकोला – 13
यवतमाळ – 1
पुणे – 19
ठाणे – 34
मुंबई – 4
बीड – 11
लातूर – 1
कोल्हापूर – 1

राज्य सरकार पर्यटकांच्या संपर्कात: उपमुख्यमंत्री
राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खासगी वाहनानं परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे. नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...