Crime News: एक अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेत पतीने गर्भवती असलेल्या पत्नीला उंच डोंगरावरून खाली फेकून दिले. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नी फौजिया यांचा जीव वाचवण्याचा शर्थीने प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. कोर्टाने दोषी पती काशिफ अशरफ याला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
फौजिया या पेशाने वकील होत्या. त्यांची आणि अशरफची पहिली भेट एका चष्माच्या दुकानात झाली होती. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि पुढे विवाह झाला. मात्र, लग्नानंतर अशरफचे खरे रूप फौजियासमोर आले. सततचे वाद, शिवीगाळ आणि मारहाण यामुळे फौजिया विभक्त होण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचल्या होत्या. प्रसंगी एक संधी देण्याच्या विचाराने दोघे आर्थर सीट या डोंगरावर फेरफटका मारण्यासाठी गेले. तिथे वाद विकोपाला गेला आणि एकटेपणाचा फायदा घेत अशरफने फौजियाला 15 मीटर दरीत ढकलून दिले.
फौजिया गंभीर जखमी अवस्थेत एका खडकावर अडकून राहिल्या आणि जोरजोरात मदतीसाठी हाक मारत राहिल्या. स्थानिक महिला दानिया रफीक यांना या प्रकाराची जाणीव होताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. स्कॉटलॅंडच्या आर्थर सीटच्या डोगंरावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि फौजियाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तिचे प्राण वाचवता आले नाहीत. या प्रकरणात न्यायालयाने काशिफ अशरफ याला 20 वर्षांची कठोर शिक्षा सुनावली असून, हा खटला संपूर्ण यूकेमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.