spot_img
देशभयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

spot_img

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. फाटक नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल बस आणि रेल्वे यांची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून १० हून अधिक मुले आणि बस चालक गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, स्कूल बस चालकाने निष्काळजीपणाने रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेने बसला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बस जवळपास ५० ते ७० मीटरपर्यंत फरफटत गेली आणि रेल्वे ट्रॅकच्या कडेला झुडपात जाऊन पडली.

अपघात इतका तीव्र होता की बसचा चक्काचूर झाला असून, बचाव कार्य सुरू असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणेवर निष्काळजीपणाचे आरोप करण्यात येत आहेत. अपघात झालेल्या ठिकाणी रेल्वे फाटक नसल्याचे आणि तेथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले आहे.

स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, पालकवर्ग आणि नागरिकांनी अशा क्रॉसिंगवर त्वरित सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...