spot_img
अहमदनगरबाळासाहेब शिरतार भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी

बाळासाहेब शिरतार भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी

spot_img

बाळासाहेब शिरतार भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी

पारनेर/प्रतिनिधी :
गेल्या अनेक वर्षापासून पारनेर तालुक्यात सामाजिक कामाच्या माध्यमातून सक्रिय असलेले सावरगाव येथील बाळासाहेब शिरतार यांची पारनेर भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे व पारनेर भाजपा तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी लाडकी बहीण योजना समितीचे पारनेर तालुका अध्यक्ष सुनील थोरात संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुभाष दुधावडे, ज्येष्ठ नेते संजय मते, अनिल दिवटे, सचिन शेळके, सरपंच लहू भालेकर, अक्षय करंजुले, भरत गट आदी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब शिरतार म्हणाले केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे हे सरकार शेतकरी महिला युवक युवती यांच्यासाठी तसेच कामगारांसाठी व दीनदलित घटकांसाठी काम करणारे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविल्या जात आहे या योजना यापुढील काळात पारनेर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे माझी भाजपा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीच्या माध्यमातून भाजपाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील व विचारांतील भारत देश घडविण्यासाठी थोडा हातभार लावणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...