spot_img
ब्रेकिंगप्रेमाच्या नाटकात शिक्षिका झाली फसवणुकीची शिकार; चहावाल्या प्रियकराने घातला २२ लाखांला गंडा

प्रेमाच्या नाटकात शिक्षिका झाली फसवणुकीची शिकार; चहावाल्या प्रियकराने घातला २२ लाखांला गंडा

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
लग्नाचे खोटे वचन देत एका ४२ वर्षीय शिक्षिकेची तब्बल २२ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून प्रियकर अक्षय रामदास काळे, त्याची आई सविता काळे आणि बहीण सुप्रिया काळे (सर्व रा. काळेवाडी, ता. पारनेर) यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित शिक्षिकेची ओळख २०१९ साली येवले अमृततुल्य चहाच्या दुकानात मॅनेजर असलेल्या अक्षय काळे याच्याशी झाली. ओळख प्रेमात बदलली आणि काळे याने तिला लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी शिक्षिकेकडून आर्थिक मदतीच्या नावाखाली पैसे उकळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला रोख रक्कम व दागिन्यांच्या स्वरूपात पैसे घेतल्यानंतर, सावेडीतील ‘येवले अमृततुल्य’ चहाची शाखा विकत घेण्यासाठी तिला २० लाखांचे कर्ज काढण्यास भाग पाडले गेले. सदर रक्कम काळे याच्या विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती.

या पैशांचा वापर करून आरोपींनी सोन्याचे दागिने, नवीन दुचाकी खरेदी केली. यानंतर काही काळातच अक्षय काळे याने ती चहाची शाखा परस्पर विकली व शिक्षिकेशी लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, या फसवणुकीमुळे घेतलेल्या कर्जाचे हप्ते आजही तिच्या पगारातून वसूल होत असल्याचे शिक्षिकेने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दीड लाखांचे गंठण लंपास
अपघाताचा बनाव रचत एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना तारकपूर परिसरात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडगाव परिसरात राहणारी एक महिला आपल्या आजारी वडिलांची देखभाल करण्यासाठी साईदीप हॉस्पिटलमध्ये थांबली होती. सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास वडिलांसाठी घरून डबा आणण्यासाठी पायी निघाली असता, एका दुचाकीस्वाराने त्यांना हलकी धडक दिली. धडक दिल्यानंतर संबंधित दुचाकीस्वाराने मदतीचा बनाव करत महिलेला उचलून आपल्याच दुचाकीवर बसवले आणि उपचारासाठी श्रीदीप हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, त्यानंतर तो तिथून निघून गेला. काही वेळात महिलेला गळ्यातील सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण गायब झाल्याचे लक्षात आले. ही बाब लक्षात येताच महिलेने तातडीने तोफखाना पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरच्या तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर; दिले महत्वाचे आदेश

पावसामुळे शेती पिकांचे नुकसान; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पारनेर / नगर सह्याद्री - गेल्या काही...

सुपा परिसरात अतिवृष्टी: ‘तो’ रस्ता दहा तास बंद, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वाचा सविस्तर

सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील सुपा, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव...

वरुणराजा कोपला…; शेवगाव, पाथर्डी, जामखेडमध्ये दाणादाण

शेवगाव, पाथर्डी, जामखेडमध्ये दाणादाण | पाच दिवस यलो अलर्ट सुपा | नगर सह्याद्री सलग दुसऱ्या...

अखेर सुप्यातील तिसरा बिबट्या जेरबंद! एक बिबट्या व दोन पिल्लाचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

सुपा । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील सुपा शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर...