पारनेर | नगर सह्याद्री
कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी सहकारी पतसंस्थेत तब्बल 81 कोटी 25 लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे उघडकीस आले असून, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि बोगस कर्जदार अशा 46 जणांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार करण्यात आली आहे.
राजे शिवाजीपतसंस्थेत संस्थेचे अध्यक्ष आझाद ठुबे यांच्यासह संचालक मंडळाने नियमबाह्य कर्ज वाटप करून 81 कोटी 25 लाखांचा अपहार केल्याचे सहकार विभागाच्या लेखा परीक्षणातून स्पष्ट झाले आहे. या संबंधीची पुरवणी फिर्याद लेखापरीक्षकांनी ऑगस्ट 2025 मध्ये दिली होती. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. सहकार विभागाचे विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम यांनी चाचणी लेखा परीक्षणानुसार 66 कोटी 69 लाख 3 हजार 228 व व्याज 14 कोटी 56 लाख 60 हजार 182 (31 मार्च 2025 अखेर व्याज) असे एकूण 81 कोटी 25 लाख 63 हजार 410 रुपयांचा अपहार झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, या आधी ठुबे, संस्थेचे उपाध्यक्ष शमशुद्दीन हवालदार, कार्यकारी संचालक संभाजी भालेकर यांच्यासह 14 जणांवर पारनेर पोलिस ठाण्यात 29 जुलै 2024 रोजी गुन्हे दाखल आहेत. याबाबत ठेवीदार बाळासाहेब तुकाराम वाळुंज यांनी फिर्याद दिली होती. आता या गुन्ह्यातच हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. आझाद ठुबे यांना अपहार प्रकरणात आधीच अटक झालेली असून, ते नाशिक कारागृहात आहेत.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
आझाद प्रभाकर ठुबे, संभाजी सीताराम भालेकर, स्वराज आझाद ठुबे, उज्ज्चला आझाद ठुबे, युसूफ हसन इनामदार, बाळकृष्ण संपत झावरे, संदीप बाळासाहेब ठुबे, किरण शंकर ठुबे, राजेंद्र दादाभाऊ ठुबे, ज्ञानेश्वर बापू ठुबे, शीतल बाळकृष्ण झावरे, तौसिब युसूफ इनामदार, अशोक एकनाथ ठुबे (संशयित), वैभव भाऊसाहेब रोहकले, भाऊसाहेब रावसाहेब रोहकले, सागर भाऊसाहेब रोहकले, चंद्ररेखा भाऊसाहेब रोहकले, दीपाली वैभव रोहकले, पोपट बोल्हाजी ढवळे, सागर पोपट ढवळे, सागर असोसिएट प्रोप्रा- पोपट ढवळे, सागर ढवळे, आरती अनिल ढवळे, आदित्य संतोष ढवळे, अनिल बोल्हाजी ढवळे, संतोष बोल्हाजी ढवळे, दशरथ विठ्ठल शितोळे, दीपक यशवंत पाटील, दशरथ शितोळे, कावेरी किरण महाडिक, तात्यासाहेब दशरथ पवार, मंगल मच्छिंद्र महाडिक, किरण मच्छिंद्र महाडिक, मच्छिद्र अंतोबा महाडिक, सुरज मच्छिंद्र महाडिक, रामचंद्र किसन वाखारे, आशा बाबुराव कातोरे, राजू बाबुराव कातोरे, बापू बाबुराव कातोरे, हनुमंत बाबुराव साबळे, अजहर इसाक शेख, राहुल पंढरीनाथ देशमुख, गणेश बाळू राऊत, अक्षय सुनील नेमाणे, सारिका विश्वनाथ आदक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.