spot_img
देशनेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन; लष्कर-ए-तैयबाची मोठी योजना?

नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन; लष्कर-ए-तैयबाची मोठी योजना?

spot_img

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. नेपाळच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबासारख्या संघटना भारतावर हल्ला करण्यासाठी नेपाळची भूमी वापरू शकतात. भारताने नुकत्याच मऑपरेशन सिंदूरफ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लॉन्चपॅड्स उद्ध्वस्त केल्यानंतर हे विधान समोर आले आहे.

काठमांडूमधील मदक्षिण आशियातील दहशतवाद: प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेचे आव्हानफ या विषयावरील कार्यक्रमात नेपाळचे राष्ट्रपतींचे सल्लागार सुनील बहादूर थापा यांनी हे वक्तव्य केले. हा कार्यक्रम नेपाळ इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड एंगेजमेंटने आयोजित केला होता. नेपाळ आणि भारतादरम्यानची खुली सीमा आणि व्हिसा-मुक्त व्यवस्था ही देखील चिंतेची मुख्य बाब बनली आहे.

थापा यांच्या मते, दहशतवादी याच व्यवस्थेचा फायदा घेऊन भारतात प्रवेश करू शकतात. नेपाळचे खासदार शिशिर खनाल यांनी पहलगाम हल्ल्‌‍याचा संदर्भ देत म्हटले की, आता भारत आणि नेपाळला एकत्र येऊन सीमा व्यवस्थापन अधिक मजबूत करावे लागेल. त्यांनी हाय-टेक पाळत तंत्रज्ञान, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त दहशतवादविरोधी कारवाई करण्याची गरज सुचवली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...

आमदार रोहित पवारांवर ईडीकडून आरोपपत्र दाखल; वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून मोठी...