spot_img
अहमदनगरनगर-मनमाड महामार्गावर अपघात; अहिल्यानगरचे सेवानिवृत्त शिक्षक ठार

नगर-मनमाड महामार्गावर अपघात; अहिल्यानगरचे सेवानिवृत्त शिक्षक ठार

spot_img

Accident News: नगर-मनमाड महामार्गावर लागोपाठ दोन दिवसांत तीन अपघात झाले आहे. काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राहुरी खुर्द येथे दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू साबळे (वय 68) हे जागीच ठार झाले. तर राहुरी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. रामनाथ डोके हे जखमी झाले.

काल सायंकाळी प्रकाश साबळे हे आपले सहकारी शिक्षक डोके यांच्या समवेत कृषी विद्यापीठाहून आपल्या घरी जात असताना राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड रस्ता ओलांडत असताना राहुरीकडून अहिल्यानगरच्या दिशेने जात असलेल्या कंटेनर (आरजे 14 जीटी 0069) ने पाठीमागून जोराची धडक दिली.

या आपघातात साबळे व डोके दोघेही रस्त्यावर पडले. साबळे यांच्या अंगावरून कंटेनरचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला तर डोके हे जखमी झाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नगर-मनमाड महामार्गावर गेल्या दोन दिवसांत चार अपघात झाले असून चौघांनाही आपले प्राण गमवावे लागले. नगर-मनमाड महामार्गावरील रस्ता अत्यंत धोकादायक असून प्रचंड खड्ड्यांमुळे वाहतुकीस असुरक्षित झाला आहे. मात्र संबधित यंत्रणा कोणतीही दखल घेण्यासाठी तयार नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...

तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

नागपूर / नगर सह्याद्री - खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण...