spot_img
अहमदनगरनगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर 2023 रोजी रद्द केला होता. गेल्या दोन वर्षाच्या काळात थकीत कर्जाची वसुली प्रक्रिया वेगाने राबवून 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत 2215 ठेवीदारांच्या 65 टक्के रकमा परत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 35 टक्के रकमा परत करण्याचे नियोजन सुरू असून या रकमादेखील लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.

बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाल्यानंतर बँकेच्या दैनंदिन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने भाडेतत्त्वावर शाखा कार्यालय असलेल्या बँकेच्या सर्व शाखा बंद करण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला. त्याचबरोबर स्वमालकीचे कार्यालय असलेल्या शाखा बंद करून त्यांचे कामकाज मुख्य शाखेत वर्ग करण्यात आले. त्यामुळे बँकेच्या दैनंदिन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली.

याचबरोबर थकीत कर्जदारांकडील कर्ज वसुली, तारण मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव आदी प्रक्रिया वेगवान करण्यात आली होती. त्यामुळे जुलै 2025 अखेर 2215 ठेवीदारांना 50 टक्के रक्कम – 9616.03 लाख रुपये तर 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत 15 टक्के रक्कम – 2884. 63 रुपये परत करण्यात आले आहेत.

ज्या खातेदारांनी आपली केवायसी कागदपत्रे अद्याप बँकेकडे जमा केलेली नाहीत त्यांनी तात्काळ ही कागदपत्रे आपल्या नजीकच्या शाखेत अथवा मुख्यालयात जमा करावीत. याचबरोबर थकीत कर्जदारांनी आपली थकबाकी रक्कम तात्काळ बँकेकडे भरून प्रशासनास सहकार्य करावे असे
आवाहन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना...

कालच भेटलो, जेवलो… गप्पा मारल्या, अजूनही विश्वास बसत नाही; आमदार कर्डिलेंच्या निधनावर सुजय विखेंची प्रतिक्रिया

आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला ; डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली...