spot_img
अहमदनगर'दाम्पत्याला' स्मशानभूमीजवळ 'विहिरीत' टाकले; अहिल्यानगर मधील 'धक्कादायक' घटनेचा घटनाक्रम

‘दाम्पत्याला’ स्मशानभूमीजवळ ‘विहिरीत’ टाकले; अहिल्यानगर मधील ‘धक्कादायक’ घटनेचा घटनाक्रम

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अ‍ॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अ‍ॅड. मनीषा आढाव (दोघे रा. मानोरी, ता.राहुरी) यांच्या अपहरणानंतर त्यांच्या डोक्यात प्लास्टिक पिशवी घालून, त्यांचे हात, पाय साडीने बांधून, त्याला दगडाची गोणी बांधून त्यांना उंबरे गावातील स्मशानभूमीजवळ विहिरीत टाकले. तसेच, ॲड. आढाव यांच्या एटीएममधून काही रक्कम आरोपींनी काढून घेतली, ॲड. आढाव यांच्या पत्नीच्या हातातील ब्रेसलेट काढून घेतल्याचे माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) याने न्यायालयासमोर सांगितले. दरम्यान आरोपीच्या वकिलांकडून ढोकणे याची उलट तपासणी सुरू झाली आहे.

राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय ३२ वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी), भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी), शुभम संजीत महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी), कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे (रा. ता. राहुरी) यांना अटक केलेली आहे. सोमवारी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षाकडून ॲड. उज्ज्वल निकम व मुख्य आरोपी किरण दूशिंग याच्या वतीने ॲड. सतीश वाणी यांनी बाजू मांडली. माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने न्यायालयासमोर वकील दाम्पत्याचे अपहरण कसे केले, यात कोणकोण सहभागी होते, कट कसा रचला याचा घटनाक्रम सांगितला होता.

मंगळवारी ढोकणे याने पुढील घटनाक्रम सांगितला. आढाव दाम्पत्याला त्यांच्याच घरात बाधून ठेवले होते. तेथे त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन पैसे काढून घेतले. हातातील ब्रेसलेट काढून घेतले. न्यायालयात या दोन्ही वस्तू ढोकणे याने ओळखल्या. आरोपींनी आढाव यांच्याकडे अधिक रकमेसाठी तगादा लावला. त्यानंतर आढाव यांचीच गाडी घेऊन त्यांना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास उंबरे येथील स्मशानभूमी येथे आणले. त्यांचे हात, पाय बांधले, दगडाची गोणी बांधून विहिरीत टाकले. तेथून आढाव यांची गाडी राहुरी न्यायालयाच्या आवारात आणून लावली. आरोपी तेथून जात असताना तेथे पोलिसांची एक गाडीही आली होती, असे ढोकणे यांनी सांगितले.

त्यानंतर माफीचा साक्षीदार ढोकणे याची आरोपीचे वकील सतीश वाणी यांनी उलटतपासणी सुरू केली. मी न्यायदंडाधिकारी यांनी नोंदविलेला जबाब वाचून पाहीला होता. मी २७ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी आठ वाजेपर्यत पोलिसांच्या ताब्यात होतो. मला त्यांनी गुन्ह्याबद्दल विचारपुस केली होती. त्या चौकशीदरम्यान माझेकडून काहीही लिहून घेतले नव्हते. एलसीबीने मला गुन्हासंबंधी कबूली जबाब द्यायचा का, असे सांगितले नव्हते. मी पोलिसांना सांगीतले होते की, मला पश्चाताप झाला आहे, असे ढोकणे याने सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तरुणावर धारदार शस्राने वार!; नालेगावात धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर धारदार शस्राने वारकरून जीवे मारण्याचा प्रयत्न...

अल्पवयीन मुलीचे लग्न लावले? आई वडिलांसह सहा जणांना भोवले..पतीचा दुसरा विवाह उजेडात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पहिल्या पत्नीसोबत घटफोट न घेता, दुसऱ्या अल्पवयीन मुलीशी विवाह करत...

पतंग पकडणं महागात पडलं, तोल गेला जिवावर बितलं!; नगर मधील दोन बालकांचा मृत्यू..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील घटनेला दोन दिवस उलटत नाही...

रेनकोट तयार ठेवा!; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट…

Rain Update: राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली...