spot_img
देशदहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढलं! दहशतवादी हल्लात भारतीय जवान शहीद

दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढलं! दहशतवादी हल्लात भारतीय जवान शहीद

spot_img

Terrorist Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये संतापाचे वातावरण असतानाच जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये गुरुवारी सकाळी चकमक सुरू होती. यामध्ये चकमकीत भारतीय जवानाला वीरमरण आले आहे.

जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे आज सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय लष्करात चमकक सुरू होती. उधमपूरमध्ये काही दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. त्यानंतर भारतीय जवानांकडून सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले. दुदू-बसंतगड परिसरात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण आले.

घटनेने संपूर्ण देशात संताप आणि शोक व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वीच पहलगामध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप २८ पर्यटकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे संतापाची लाट असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोके वार काढले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान नगरकरांनो! शहरातील भेसळयुक्त तुपाचा पर्दाफाश, पुण्यात तयार करून नगर शहरात विक्री

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- नगर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

नगरमध्ये चाललंय काय? पोलिसांची गुंडागिरी?, दुकानदाराला मारहाण!, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील कोल्हार गावात एका पोलीस हवालदाराने दुकान बंद करण्याच्या...

आजचे राशी भविष्य! आजचा दिवस नवीन यशांनी भरलेला, वाचा कोणाच्या आयुष्यात येणार भरभराट?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे...

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....