spot_img
अहमदनगरडॉ. सुजय विखे पाटलांची पारनेर दूध संघाच्या संचालकांनी घेतली भेट; काय झाली...

डॉ. सुजय विखे पाटलांची पारनेर दूध संघाच्या संचालकांनी घेतली भेट; काय झाली चर्चा?, वाचा सविस्तर..

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री:-
नुकत्याच पार पडलेल्या पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेल ने जोरदार विजय मिळवत १५ पैकी तब्बल १२ जागांवर बाजी मारली. दरम्यान, आज लोणी येथे या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली.

आमदार काशिनाथ दाते आणि भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत सर्वांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले व असेच मार्गदर्शन यापुढेही लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. या निवडणुकीत डॉ. विखे यांनी थेट मोर्चा हाती घेत कार्यकर्त्यांची संघटित मोहीम राबवली. त्यामुळे खासदार निलेश लंके यांच्या सहकार पॅनेलचा पराभव झाल्याचे मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पारनेर दूध संघावर काम करत असताना सर्वांच्या हातून सकारात्मक कार्य घडावे,असे मत त्यांनी मांडले. पारनेर तालुका दूध संघ तब्बल दहा वर्षे बंद अवस्थेत होता. मात्र, चार वर्षांपूर्वी पुन्हा सुरू झाल्यानंतर सध्या दररोज सुमारे ६ हजार लिटर दूध संकलन होते, जे पूर्वी ७० हजार लिटरपर्यंत पोहोचत असे. हा संघ पुन्हा शेतकरी व संचालकांच्या ताब्यात देत पूर्वीचे वैभव परत मिळवून देण्याचा निर्धार डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला असून, त्या दिशेने योग्य ती पावले उचलण्याबाबतही चर्चा झाली.

प्रवरा नगर येथे पारनेर तालुका दूध संघाच्या विकासात्मक बाबींवर संपन्न झालेल्या या सविस्तर चर्चेत राहुल शिंदे पाटील, विश्वनाथ कोरडे, प्रशांत गायकवाड, सभापती गणेश शेळके, सचिन वराळ, ज्येष्ठ नेते रामचंद्र मांडगे, विक्रम कळमकर, भास्कर उचाळे, शिवाजी खिलारी, दत्तानाना पवार, लहु भालेकर, शंकर नगरे, पंकज कारखिले, अश्विनीताई थोरात, सुषमा रावडे, सोनाली सालके, निर्मला भालेकर, कल्याण काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवडून आलेले सदस्य
दादाभाऊ वारे, किसन गवळी, दत्तात्रय पवार, संदीप ठुबे, कल्याण काळे, सविता औटी, उत्तम भालेकर, मारुती मुंगसे, निर्मला भालेकर, युवराज पठारे, भीमराव शिंदे व राजेंद्र पाचारणे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...