Maharashtra Crime News: मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. तपासात पोलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायावर छापा टाकत २ पीडित तरूणींची सुटका केली. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी फरार असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
धुळे शहरातील देवपूर भागातील झेंडा चौकाजवळील सप्तश्रृंगी कॉलनीतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. याबाबत गुप्त माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीच्या व्यवसायावर छापा टाकण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी बॉडी मसाज पार्लरवर छापा टाकण्यासाठी पोलीस पथक तयार केली. पोलिसांनी माहितीच्या आधारे, धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत पोलिसांनी २ पीडित तरूणींची सुटका केली. मात्र, या कारवाईत मुख्य आरोपी फरार झाला.
सध्या पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



