मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रातील नव्या सरकारचा आज शपथविधी पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहा आमदारांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
हे सहा जण विधान परिषद सदस्य विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नसल्याने त्यांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हे सर्व 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत.