spot_img
अहमदनगरगुजरातच्या चौघांना अटक; नगरच्या अनेकांना 'असा' घातला होता गंडा.

गुजरातच्या चौघांना अटक; नगरच्या अनेकांना ‘असा’ घातला होता गंडा.

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
व्हॉट्स ॲप ग्रुपवर शेअर ट्रेडिंगची जाहिरात करून गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 47 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरात राज्यातून चौघांना ताब्यात घेण्यात आले. सायबर पोलिसांनी तांत्रिक विलेषणाच्या आधारे तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला.

जावेदभाई मोहम्मदभाई सुमारा (वय 40, रा. ता. वेरावल, जि.गिर सोमनाथ, गुजरात), जिग्नेश मोहनभाई कलसरिया (वय 27, रा. ता. गिरगढडा, जि. गिर सोमनाथ, गुजरात), महादेव जसुभाई गेढिया (वय 30, रा.शांतीविहार सोसायटी, पर्वत पटिया, सुरत शहर), रवी रामजीभाई आजगिया (वय 36, रा. शिवदर्शन सोसायटी, कतरग्राम, सुरत शहर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

19 जून 2024 ते 11 जुलै 2024 या कालावधीत आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए 5 या व्हॉटसॲप ग्रुपवरून ॲडमीन अनिका शर्मा या नावाने एका व्यक्तीला शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळवून देऊ, असे सांगत विश्वास संपादन केला. यातून फिर्यादीची 47 लाख 3 हजार 543 रुपयांची फसवणूक करण्यात आली. मागील वष हा गुन्हा दाखल झाला होता.

फिर्यादीने ज्या बँकेच्या खात्यात पैसे जमा केले, त्याची माहिती घेऊन जावेदभाई सुमारा व जिग्नेश कलसरीया यांना निष्पन्न करण्यात आले. जिग्नेश कलसरीया यास महादेव गेढीया व रवी आजगिया यांनी खाते उघडण्यासाठी मदत केली, असे समोर आले. त्यानुसार चौघांना सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

15 टक्के कमिशनचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 80 लाखांची फसवणूक
विमान तिकीट व हॉटेल बुकिंग व्यवसायात गुंतवणूक करून 15 टक्के कमिशनचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची 80 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश ब्रिजलाल बन्सल (वय 55, रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये राहुल दर्शन जगताप, एंजल राहुल जगताप, सुशिला दर्शन जगताप (रा. सानपाडा, नवी मुंबई) व इब्राहीम सॅम्युअल (रा. भोपाळ) यांनी रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायझेशनफ या कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याभरात चांगला परतावा व 15 टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार बन्सल यांनी 4.70 कोटी रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले. त्यानंतर परतावा देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मुद्दल रकमेची मागणी करण्यात आल्यावर 3.90 कोटी रुपये परत केले. उर्वरित 80 लाख रुपये व कमिशन न दिले नाही. दरम्यानच्या काळात अनुज मित्तल यांनीही संबंधितांविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे समोर आले. त्यामुळे बन्सल यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली. मात्र, त्याची दखल घेऊन कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयात बन्सल यांच्या वतीने ॲड. अभिजीत पुप्पाल यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले होते. त्यानुसार सोमवारी (28 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवेंद्रजी, सरकारचे हजारो कोटी पाण्यात जाणार; नगर- कल्याण हायवेचे काम अतिशय निकृष्ट

नगर- कल्याण हायवेचे काम अतिशय निकृष्ट | अधिकाऱ्यांसह- लोकप्रतिनिधींचे अर्थपूर्ण दुर्लक्ष पेवर मशिनऐवजी मजुरांकडून...

‘विखे पाटील स्पोर्ट्सच्या दिव्यांग खेळाडूंची चमकदार कामगिरी’

राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन खेळाडूंची निवड; जलतरण व पॉवरलिफ्टिंगमध्ये यश अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्पेशल ऑलिंपिक भारतच्या...

पाकव्याप्त काश्मीरचं अस्तित्व नेहरुंमुळेच; शाहांनी फोडलं खापर; काय म्हणाले पहा…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या...

थार गाडीत गवसलं घबाड?; ‘या शिवारात कारवाई, पण..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- भारतीय चलनाच्या 500 रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा...