spot_img
ब्रेकिंगखळबळजनक! झाडाझुडूपात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

खळबळजनक! झाडाझुडूपात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री
श्रीरामपूर शहराजवळ खैरीनिमगाव व भैरवनाथनगर शिवारात अज्ञात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. रविवारी सायंकाळी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तपास सुरू झाला आहे. भैरवनाथ बनाजवळ खोल खड्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. त्याच्याजवळ ओळखीचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळू शकलेला नाही. तरुणाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षांदरम्यान आहे.

रस्त्याच्या कडेला आतील बाजूस झाडाझुडूपामध्ये मृतदेह आढळून आला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमलेली होती. रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही बाब समजली. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पँट त्याने घातलेली आहे.

मृतदेहाच्या चेहऱ्याची अतिशय वाईट अवस्था असल्याने ओळख पटवण्यास अडचण येत आहे. रविवारी रात्री उशिरा मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाचा उग्र वास सुटलेला होता. पोलिस तांत्रिक माहितीच्या आधारे ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. यामागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...