spot_img
अहमदनगरखडीमाफिया दत्तात्रय शेळके म्हणतो, कलेक्टर अन्‌‍ पोलीस माझ्या खिशात!

खडीमाफिया दत्तात्रय शेळके म्हणतो, कलेक्टर अन्‌‍ पोलीस माझ्या खिशात!

spot_img

अकोले तहसीलदारांनी वहिवाट रस्ता मंजूर केला, बेलापूरच्या खडी क्रशरवाल्याने उखडून टाकला!
10 लाख खर्चून तयार केलेला रस्ता खडीमाफिया दत्तू शेळकेने पोकलेन लावून उखडून टाकला
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यात राज्य नक्की कोणाचे आहे असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. महसूल आणि पोलिस प्रशासनाचे कॅप्टन नव्याने दाखल झालेले असताना आणि त्यांच्याकडून गुंडाराज, खडी-वाळू माफीयांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवली जात असताना बेलापूर (अकोले) येथील खडीक्रेशर चालकाने संपूर्ण बेलापूर गाव वेठीस धरले आहे. तहसीलदारांनी वहिवाट रस्ता मंजूर केला असताना दत्तात्रय शेळके या मस्तवाल खडीमाफीयाने गावकऱ्यांनी स्ववर्गणीतून दहा लाख रुपये खर्च करुन तयार केलेला चार किलो मीटर लांबीचा रस्ता पोकलेन लावून उखडून टाकला. नगरचा कलेक्टर आणि पोलिस अधीक्षक माझ्या खिशात असून त्यांना मी हप्ते देतो, ते माझे काहीच वाकडे करु शकत नाही अशी मस्तवाल भाषा हा खडीमाफीया बेलापूरच्या ग्रामस्थांना वापरत आहे. संपूर्ण रस्ता पोकलेन लावून उखडून लावला व त्याबाबत तहसीलदारांसह अकोले पोलिसांकडे तक्रार केली असतानाही त्यांच्याकडून या माफीयाच्या विरोधात काहीच कारवाई न झाल्याने या खडी माफीयाच्या दाव्यात तथ्य असल्याची भावना आता गावकऱ्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील बेलापुर अंतर्गत पवारवाडी या गावातील शेत मिळकत सं.न./गट नं.269/1,269/2 व 269/3 या मिळकतीत जाण्या-येण्यासाठी व स्थानिक लोकांना येणेजाणेसाठी पुर्वापार वहीवाटीचा रस्ता खुला होऊन मिळणेसाठी अकोले तहसीलदार यांचेकडे केस नं. 30/2024 ही दाखल केलेली होती. सदर केस मध्ये अर्जदार यांना त्यांचे वहीवाटीचे मौजे बेलापुर येथील स.नं./गट नं. 269/1,269/2 व 269/3 मध्ये जाणे येणे साठी मौजे बेलापुर येथील वहीवाटीचे स.नं./ग.नं. 268,272, 267, 266,275 व स.नं./ग.नं.271,276, 277 चे बांधावरुन नवीन 12 फुट रुंदीचा रस्ता मंजुर करण्यात येत असल्याचा आदेश दि. 5 जून 2025 रोजी पारित झाला.

तहसीलदारांच्या या आदेशानुसार सदर रस्ता गावच्या लोकांनी स्थानिक वर्गणी गोळा करुन येण्या जाण्यासाठी तयार केला होता. सदर रस्त्यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च गावकऱ्यांनीच केला. तहसीलदारांच्या लेखी आदेशान्वये रस्ता तयार केलेला असताना दत्तात्रय धोंडिबा शेळके, जयश्री दत्तात्रय शेळके, शुभम दत्तात्रय शळके व इतर दोन महिला यांनी रवि शर्मा पोकलैंड ऑपरेटर यांनी दि. 4 ऑगस्ट रोजी सदर रस्ता उखडून टाकला. रस्त्यामध्ये टाकलेले सिमेटचे पाईप तोडून टाकले.

तसेच सोबत काही महिला आणल्या होत्या आणि त्यांना पुढे करत दत्तात्रय शेळके याने गावकऱ्यांना शिव्या आणि दमदाटी करता तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करु अशी धमकीही दिली. दत्तात्रय धोंडिबा शेळके यांचे त्याच परिसरात खडीक्रेशरचा व्यवसाय असल्यामुळे पैशाच्या जोरावर दमदाटी करुन त्याने हा रस्ता उखडून टाकला असून तहसिलदार अकोले यांच्या आदेशाचा अवमान केला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

स्वातंत्र्यदिनी गावकरी जनावरांसह धडकणार तहसील कार्यालयावर!
अनेक शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा बेलापूर, पवारवाडी येथील हा रस्ता उखडून टाकल्याने आता या गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना रस्ताच राहिला नाही. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे याबाबत तहसीलदारांनी संबंधीतावर गुन्हा दाखल करावा आणि आमचा रस्ता आता शासनाने अथवा संबंधीतांकडून तयार करुन देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत 15 ऑग़स्टपर्यंत कार्यवाही झाली नाही तर सर्व ग्रामस्थ, विद्याथ हे जनावरांसह तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

आळेफाट्यात (जुन्नर) राहून नगरचे अधिकारी विकत घेणारा दत्तात्रय शेळके!
अकोले तालुक्यातील बेलापूर येथे गौणखनिजाची तस्करी करत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणारा दत्तात्रय शेळके हा आळेफाटा (जुन्नर) परिसरात राहतो. त्याचे गाव देखील तेच!म्हणजेच जुन्नर (पुणे) येथे राहत असतानाही तो नगरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना विकत घेतल्याची भाषा वापरत आहे. पैशांची मस्ती किती आहे हेच यातून स्पष्ट होते. गौणखनिज माफीया असणाऱ्या या दत्तात्रय शेळके याच्या विरोधात पोलिस आणि महसूल प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे

संमती देऊनही त्याने रस्ता उखडून टाकला!
वहीवाट रस्ता देण्याबाबत दत्तात्रय शेळके याच्यासह कल्याणी ठीकेकर, धनंजय ठीकेकर, जयश्री शेळके यांनी अकोले तहसीलदारांसमोर चालू असलेल्या केस नं. 30/2024 नुसार सदरचा रस्ता वापरण्यास आमची कोणतीही हरकत नसल्याचे लेखी दिले. त्यानुसार तहसीलदारांनी दि. 5 जून 2025 रोजी मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5 अन्वये निकाल दिला आणि वहीवाट रस्ता म्हणून 12 फूट रुंदीचा रस्ता मंजूर करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार दहा लाख रुपये खर्चून गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. आता तोच रस्ता त्याने पोकलेन लावून उखडून टाकला..

तहसीलदारांची भूृमिकाच अनाकलनीय!
रस्ता केसनुसार कायद्याने दिलेले अधिकार वापरत व दत्तात्रय शेळके आणि अन्य तिघांनी रस्ता करण्यास संमती दिली. त्यानुसार निकाल देण्यात आला. रत्यावर गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून दहा लाख खर्चून रस्ता तयार केला असताना तो रस्ता संपूर्ण रस्ता उखडून टाकण्यात आला. त्यामुळे दत्तात्रय शेळके याच्यासह त्याच्या पत्नीने तहसीलदारांच्या आदेशाचा अवमान केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेळके पती- पत्नीच्या विरोधात तहसीलदारांनी अद्यापही गुन्हा दाखल का केला नाही असा प्रश्न गावकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

अकोले पोलिसांची भूमिकाच संशयास्पद!
अनधिकृतपणे सार्वजनिक रस्ता खोदून, त्याचे विद्रुपीकरण करण्यात आले. तहसीलदारांचा आदेश तुडवला आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधीत गावकऱ्यांनी अकोले पोलिसांकडे धाव घेतली असता अकोले पोलिसांनी खडी माफीया असणाऱ्या दत्तात्रय धोंडिबा शेळके, जयश्री दत्तात्रय शेळके, शुभम दत्तात्रय शळके यांच्याविरोधात फक्त अदखल पात्र गुन्हा दाखल केला.

नगरमधील वादग्रस्त बोरसे अकोल्यातही वादग्रस्तच!
नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्तीस असताना पोलिस निरीक्षक बोरसे यांच्या विरोधात अनेक गंभीत तक्रारी झाल्या. त्यांच्या विरोधात आंदोलने देखील झाली. यानंतर त्यांची बदली अकोले पोलिस ठाण्यात करण्यात आली. येथे देखील त्यांचे कारनामे चालूच असल्याचे अनेकदा समोर आले आहे. गावकऱ्यांचा सार्वजनिक रस्ता उखडून टाकणाऱ्या दत्तात्रय शेळके याच्यासोबत आळेफाट्यात जाऊन पाट झोडणाऱ्या बोरसे याच्याकडून खडीमाफीया दत्तात्रय शेळके याचीच पाठराखण केली जात असल्याचे आता लपून राहिलेेले नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सिस्पे’, साकळाई योजनेबद्दल विखे पाटलांचे मोठे विधान, जनतेच्या पैशाची जबाबदारी ‘त्या’ लोकप्रतिनिधीची

पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. सुजय विखे...

आझाद ठुबे यांच्या राजे शिवाजी पतसंस्थेत 67 कोटींचा घोटाळा

अपहाराशी संबंधित 40 घोटाळेबहाद्दरांसह सहा कर्मचारी दोषी पारनेर | नगर सह्याद्री माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद...

गणेश मंडळांना मिळणार एका क्लिकवर परवानगी; आयुक्त डांगे यांनी दिली माहिती, पहा लिंक..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गणेशोत्सवात व इतर सण-उत्सव काळात मंडप उभारणी, स्वागत कमानी, रनिंग मंडपसाठी...

कोटक महिंद्रा बँकेत पावणेपाच लाखांचा अपहार; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री बँकेच्या कर्मचारी आयडीचा वापर करुन कर्जदारांकडून पैसे जमा केले. परंतु ती...