spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा आरोप : महावितरणच्या प्रीपेड मीटरने ग्राहकांची लूट

काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा आरोप : महावितरणच्या प्रीपेड मीटरने ग्राहकांची लूट

spot_img

 

अमरावती : नगर सह्याद्री
महाराष्ट्रात सध्या महावितरणच्या वतीने घरोघरी जाऊन प्रीपेड मीटर लावण्याचे काम जोरात सुरू आहे. मात्र, हे मीटर म्हणजे मोबाईल रिचार्ज प्रमाणे ग्राहकांची लूट करणारे आहे. वीज प्रीपेड मीटरमध्ये भविष्यात २८ दिवसांचा प्लॅन असेल. त्या माध्यमातून वर्षाला १२ ऐवजी १३ महिने कंत्राटदार वीज ग्राहकांकडून वसुली करतील, असा खळबळ जनक दावा काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महावितरणच्या वतीने प्रीपेड वीज मीटर लावण्याचा धडाका सुरू झालेला आहे. या मीटरचे अनेक फायदे सांगितले जात आहेत. तरी पहिल्याच टप्प्यात मीटर रिडींग घेणारे हजारो हात बेरोजगार होणार असल्याने राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. वीज ग्राहकांना हे मीटर सक्तीचे करू नये यासाठी अनेकांनी न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावला आहे.

रिवेम्प्ड डिस्ट्रीब्यूशन सेक्टर स्कीम (आरडीएसएस) अंतर्गत हे प्रीपेड वीज लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रीपेड मीटर चे अनेक धोके असल्याचे तज्ञांचे मत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख महाराष्ट्र टाईम सोबत बोलताना म्हणाले की, प्रीपेड वीज मीटर म्हणजे ग्राहकांची शुद्ध लूट आहे. खाजगी कंपन्यांसोबत हात मिळवणी करून सरकारमधले लोक चंदा दो धंदा लो या तत्त्वावर काम करत आहे.

ज्याप्रमाणे मोबाईल कंपन्या २८ दिवसांचा रिचार्ज देतात. त्याचप्रमाणे हे प्रीपेड मीटर सुद्धा भविष्यात काम करणार आहे. वीज मीटर आणि मोबाईल बिलच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्यांच्या आयुष्यात दुष्काळात १३ महिने दाखल केला आहे म्हणजे वर्षाला ३६५ दिवस. मात्र, आता २८ दिवसांच्या हिशोबाने १२ महिन्याचे ३३६ दिवस होतील. दरवर्षी २९ दिवसांचे अतिरिक्त पैसे या कंत्राटदार कंपन्या वसूल करतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगावमध्ये अवजडचा पोरखेळ; बॅरिकेट चुकीच्या ठिकाणी टाकल्याने नारिकांना त्रास

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जेएलपी टॉवर लिंक रोड, भूषणनगर तू गहिले दूध डेअरी दरम्यान...

बच्चू कडूंचे आंदोलन पेटले; समृद्धी मार्गावर टायर जाळले, मागण्या काय?

नागपूर । नगर सहयाद्री:- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी...

धुरळा उडणार, तयारीला लागा! कधी लागणार आचारसंहिता?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पाच...

हातचलाखी पडली महागात; दोन महिला जेरबंद, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दिपावली सणाच्या काळात कर्जत जिल्ह्यात सराफ व्यवसायीकांचे दुकाने आणि प्रवाशांचे लक्ष...