मुंबई | नगर सह्याद्री
दादरमधील कबुतरखान्याचा वाद चांगलाच पेटला आहे. मुंबई महानगर पालिकेने हा कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजाकडून त्याठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर बुधवारी कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठी माणसं सहभागी झालेत. यावेळी कबुतरखाना परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. यावेळी पोलिसांनी पत्रकारांनाही आरेरावी केली. दादर येथील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ बुधवारी मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती तरी देखील आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्या.
या आंदोलनापूव पोलिसांनी मराठी एकीकरण समितीला नोटीस देखील दिली होती तरी देखील आंदोलन करण्यात आले त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली. यामुळे काही आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आणि ताब्यात घेतल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. यावेळी त्यांनी पोलिसांना जैन समाजातील आंदोलकांवर का कारवाई करण्यात आली नव्हती? असा संतप्त सवाल विचारला.