पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये खडकवाडी खऱ्या अर्थाने मोठे बाजारपेठेचे ठिकाण बनत आहे. दुष्काळी पट्टा असला तरी हा भाग विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. खडकवाडी गावाला जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी खडकवाडी येथे विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
रविवार (दि. २४) ऑगस्ट रोजी खडकवाडी आणि वारणवाडी येथे एकूण १४६ लाख रुपये किमतीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते करण्यात आले. खडकवाडी येथे ६७ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा समावेश असून, यामध्ये खडकवाडी सबस्टेशन येथे नवीन ट्रांसफार्मर लोकार्पण, शिंदे वस्ती रस्त्याचे भूमिपूजन, तसेच हुलावळे वस्ती, नवले वस्ती आणि डोंगर पायथा येथे नवीन सिंगल फेज लाईट जोडणी आणि ट्रांसफार्मर बसविण्याच्या कामांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे, वारणवाडी येथे ७९ लाख रुपये किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. यात वारणवाडी सबस्टेशन येथे नवीन ट्रांसफार्मर बसविणे, जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचे बांधकाम, काशीद वस्ती येथे नवीन लाईट जोडणी आणि हंडेवाडा बिरोबा मंदिर सभामंडप बांधकाम यांचा समावेश आहे. या विकासकामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावेल.
यावेळी आमदार काशिनाथ दाते यांच्यासह, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, नगरसेवक युवराज पठारे, देवराम मगर, माजी सरपंच शिवाजी खिलारी, युवा नेते सुभाष सासवडे, अक्षय गोरडे, माजी सरपंच साहेबराव वाफारे, सुभाष दुधाडे, सुषमा रावडे, डॉ. किशोर ढोकळे, विकास रोकडे, अमोल रोकडे, साबाजी गागरे, विकास पवार, संतोष मोरे, साहेबराव रोकडे, पांडुरंग हांडे, लहू रावडे, प्रसाद कर्णावट, विठ्ठलराव रोकडे, कोंडीभाऊ गागरे, ज्ञानदेव गागरे, प्रा. मारुती ढोकळे, बबन चौधरी, संजय कर्नावट, अरुण गागरे, सखाराम नवले, किरण वाबळे, धनंजय ढोकळे, रवी गागरे, पोपट हुलावळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी
खडकवाडी गावात व परिसरामध्ये आमदार काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागली आहेत. या पुढील काळातही गावच्या विकासासाठी व सर्वांना सोबत घेऊन आमदार दाते यांच्या माध्यमातून मोठा विकासनिधी खडकवाडीला मिळविण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ कटिबद्ध आहोत.
डॉ. किशोर उर्फ बाबासाहेब ढोकळे, खडकवाडी
पंचायत समितीसाठी विकास रोकडे आघाडीवर!
खडकवाडी, कामटवाडी, मांडवे खु. या भागात चांगला जनसंपर्क असलेले नेतृत्व विकास रोकडे यांचे नाव पंचायत समिती निवडणुकीमध्ये टाकळी ढोकेश्वर गणातून आघाडीवर आहे. आमदार काशिनाथ दाते यांचे ते जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात.