spot_img
अहमदनगरParner News: रेशनकार्डचे क्रेडीट घेण्याची वेळ, हेच दुर्दैव! ग्रामपंचायत सदस्यांचा लोकप्रतिनिधीवर निशाणा

Parner News: रेशनकार्डचे क्रेडीट घेण्याची वेळ, हेच दुर्दैव! ग्रामपंचायत सदस्यांचा लोकप्रतिनिधीवर निशाणा

spot_img

सरपंच सौ. रोकडे यांच्यामुळेच प्रश्न मार्गी लागला| दत्तानाना पवार यांच्यासह सात ग्रामपंचायत सदस्यांचे पत्र
सुपा | नगर सह्याद्री-
Parner News: सुपा गावातील रेशनकार्डपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना रेशनकार्ड मिळावेत यासाठी सुपा ग्रामपंचायतीने ग्रामसभा आणि मासिक सभेत ठराव केले. पात्र लाभार्थींची यादी तहसील प्रशासनाला सादर केली. यानंतर त्याचा पाठपुरावा सरपंच सौ. मनिषा योगेश रोकडे यांनी केला. त्यानंतर प्रशासन जागे झाले आणि रेशनकार्डचा विषय मार्गी लागला. मात्र, असे असताना या कामाचे श्रेय आमदार घेत असतील तर त्यासारखे दुर्दैव नाही. रेशनकार्डचे श्रेय घेण्याची दुर्दैवी वेळ आमदारांवर यावी हीच मोठी शोकांतिका असल्याचा टोला सुपा ग्रामपंचायत सदस्य दत्तानाना पवार, पप्पू पवार, प्रताप शिंदे, सुरेश नेटके, सागर मैड, कानिफ पोपळघट, सौ. अनिता पवार यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे लगावला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सुपा गावातील १५५ कुटुंबांचा रेशन कार्डचा प्रश्न अनेक महिने रेंगाळला होता. १६-१७ महिन्यांचा रखडलेल्या प्रश्न प्रशासनासमोर मांडताना योगेश रोकडे यांनी टॅस भरणारे अपात्र रेशन कार्ड धारकांची नावे कमी करुन गरिब ज्यांना खरच गरज असणार्‍या व पात्र असणार्‍या गरिब नागरिकांना रेशन कार्ड मिळण्याची मागणी मोठया तळमळीने केली होती. ग्रामपंचायत कार्यालयात या अनुषंगाने संबंधित लाभार्थी आणि यंत्रणा यांची बैठकही झाली.

यानंतर स्वत: तहसील कार्यालयातील संबंधित टेबलवर पुरवठा निरीक्षक आणि नायब तहसीलदार यांच्याकडे सलग तीन दिवस ठाण मांडून हा विषय मार्गी लावला. सुपा ग्रामपंचायतच्या माध्यमातून योगेश रोकडे यांनी मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लावली आहेत. त्यांच्या कामाचा आवाका आणि काम करण्याची पद्धत विरोधकांच्या पोटात गोळा आणणारी ठरली असून त्यांच्या कामाचा धसका घेत रेशनकार्ड सारख्या कामात आमदारांनी श्रेय घ्यावे, यातच त्यांची नामुष्की असल्याचा टोला ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकाद्वारे लगावला आहे.

सामाजिक बांधिलकी जपत योगेश रोकडे व त्यांच्या मित्रमंडळींनी गावात काही महिन्यांपूर्वी स्वर्गरथ भेट दिला. या रथामुळे सुपा गावच नव्हे तर परिसरातील गावांची मोठी सोय झाली. पदरमोड करत योगेश रोकडे हे काम करत असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. नको त्या कामाचे श्रेय घेण्याची वेळ त्यातूनच त्यांच्यावर आली असून सुप्यातील जनता सुज्ञ असून त्यांच्याकडे सर्व नोंदी असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...