spot_img
अहमदनगररात्रीस खेळ चाले! भर रस्त्यात ड्रोनच्या घिरट्या, उडवणारे वेगळीच भाषा बोलतात? लुटमारीचा...

रात्रीस खेळ चाले! भर रस्त्यात ड्रोनच्या घिरट्या, उडवणारे वेगळीच भाषा बोलतात? लुटमारीचा नवा फंडा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-

भर रस्त्यात दोन तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यात ड्रोनच्या घिरट्या आणि पुढे घडलेला प्रकार यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक माहिती अशी: राहता तालुक्यामधील  गळनिंब गावातील दोन युवक आपल्या दुचाकीवरून मित्राच्या घरी जात असताना भर रस्त्यात त्यांना आपल्या डोक्यावर ड्रोन फिरताना दिसले.

त्यांनी ड्रोनचा शोध घेण्यासाठी आपली दुचाकी थांबवली. दरम्यान ऊसाच्या शेतीतून एक व्यक्ती दगडफेक करीत समोर आला आणि धारदार स्टिकने हल्ला केला.

एक युवक हल्ल्यात जखमी झाला, पण दुसऱ्याने प्रतिकार करत स्टिक ताब्यात घेतला. हल्ला करणाऱ्या व्यक्तीने वेगळी भाषा बोलत साथीदारांना आवाज दिला, त्यामुळे दोन्ही युवक जीव मुठीत धरून शेजारील वस्तीकडे पळाले.

त्यानंतर गळनिंब उक्कलगाव कुरणपूर येथील पाच – सहाशे युवक, ग्रामस्थ व लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी फौज फाट्यासह उसाचे शेत पिंजून काढले पण ते मिळून आले नाही.

तसेच मध्यरात्री अनेक घरांवर दगड फेक झाल्याचेही नागरिक सांगत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वक्फ बोर्डबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

३ सदस्य बिगर मुस्लिम राहतील, पण ५ वर्षांची अट नाकारली नवी दिल्ली / वृत्तसंस्था - वक्फ...

मनपा प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी?

शहरप्रमुख काळेंचा संतप्त सवाल / राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत शहर ठाकरे सेनेने घेतली १४...

“रस्त्यावर कचरा नकोच आता…, नाही सहन होणार रस्त्यावरील घाण आता…”

हातात फलक, ओठांवर घोषणा घेऊन नागरिकांची स्वच्छता रॅली अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील सर्वत्र साचलेल्या...

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...