spot_img
महाराष्ट्रमराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

spot_img

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिले. परंतु मराठा समाजाला ते मान्य नसून सरकारचा हा निर्णय फसवा असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय.

सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज (२४ फेब्रुवारी) राज्यातील गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं असल्याची माहिती मिळाली आहे. जालन्यात मराठा आंदोलकांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली.

यावेळी पोलिसांनी २५ मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे नांदेडमधील एका तरुणाने राज्य सरकारचा निधेष करत भररस्त्यात पेट्रोल टाकून आपली नवीकोरी दुचाकी जाळून टाकली. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शिवहरी लोंढे असं दुचाकी जाळणाऱ्या मराठा तरुणाचं नाव असून तो नांदेडच्या लोंढे सांगवी येथील रहिवासी आहे. नांदेडमध्ये सुरू असलेल्या रास्तारोको आंदोलनात शिवहरी हा सहभागी झाला होता. यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात राजकीय धुळवड! नाना पटोलेंची अजित पवार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर

मुंबई । नगर सहयाद्री:- देशात सगळीकडे होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्यातच...

गाळे भाडे वसुलीसाठी मनपाचा ऍक्शन प्लॅन; विशेष ‘स्क्वॉड’ मैदानात, आयुक्त म्हणाले आता…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : महापालिकेच्या करसंकलन विभागासाठी गाळे भाडे थकबाकी मोठी डोकेदुखी ठरत आहे....

दूध उत्पादकांना खुशखबर; दरात दोन रुपयांनी वाढ; कधीपासून पहा..

मुंबई / नगर सह्याद्री : उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी...

नगरमध्ये तलवारीने सपासप वार; दोन गटात ‘या’ ठिकाणी राडा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहरातील घासगल्ली येथे दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीत...