spot_img
ब्रेकिंगParner News: भाजप नेत्यांची मध्यस्थी यशस्वी! सरपंच कारखीले यांचे उपोषण मागे, लोकप्रतिनिधी...

Parner News: भाजप नेत्यांची मध्यस्थी यशस्वी! सरपंच कारखीले यांचे उपोषण मागे, लोकप्रतिनिधी यांच्या ‘त्या’ भुमिकेवर टीका

spot_img

राळेगण थेरपाळ | नगर सह्याद्री-
भाजप नेत्यांची मध्यस्थी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने सरपंच पंकज कारखीले, म्हसे खुर्द व राळेगण थेरपाळ ग्रामस्थांचे उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती राळेगण थेरपाळ व म्हसे खुर्द ग्रामस्थांनी दिली.

म्हसे खुर्द ते राळेगण थेरपाळ हा साडेपाच किलोमीटरचा रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून यामध्ये या रस्त्यासाठी राज्य सरकारने साडेसात कोटी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच कारखीले व ग्रामस्थांनी केली होती. मुख्यमंत्रीसह संबंधित मंत्र्यांना निवेदन पाठवले होते. तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यावर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. निधी उपलब्ध न झाल्यास पारनेर तहसील कार्यालय येथे उपोषणाचा इशारा दिला होता.

मात्र आमदार नीलेश लंके यांनी पक्षपातीपणा केला असून यावर निधी उपलब्ध होण्यासाठी लंके यांनी आडकाठी आणल्याचा आरोप सरपंच कारखिले यांनी करीत सोमवारी (दि. ११) उपोषणाला बसले होते.मंगळवारी (दि. १२) दुपारी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सुप्याचे सरपंच दत्ता पवार यांनी सरपंच कारखिले यांच्यासह आंदोलकांना भेटून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र उपोषणावर ठाम असून जो पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोरडे व शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना संपर्क करुन पारनेर येथे बोलावून घेतले. यावेळी कार्यकारी अभियंता पालवे, डेप्युटी इंजिनियर तीपोळे, ज्युनिअर इंजिनियर लेंडे यांनी तातडीने आंदोलकांशी चर्चा केली. तसेच हे काम प्राधान्याने घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सरपंच पंकज कारखीले व ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. यावेळी सरपंच पंकज कारखीले यांना भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सुप्याचे सरपंच दत्ता पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.

लोकप्रतिनिधीनी भ्रम दूर करावा

तालुक्याचे लोकप्रतिनिधी विकासकामांत कसे राजकारण करतात हे जनतेला माहित आहे. आपण म्हणजे राज्य चालवतो हा त्यांचा भ्रम आहे. लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक असतो, हा त्यांचा दिखावा आहे. मुखमे राम बगलमे छुरी, ही त्यांची प्रवृत्ती जास्त दिवस चालणार नाही. या उपोषणाला तालुक्यातील सर्व नेत्यांनी समक्ष भेटून पाठिंबा देत पाठबळ दिले त्याबद्दल धन्यवाद. विकास कामे होत राहणार आहेत. शासकीय अधिकारी महत्वपूर्ण असून आपण सत्तेत आहे, म्हणून काहीही करु शकतो हा भ्रम त्यांनी दूर करावा.

– पंकज कारखीले, सरपंच, राळेगण थेरपाळ

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....