spot_img
अहमदनगरपारनेर दूध संघाच्या अध्यक्षपदी विखे समर्थक दत्तानाना पवार यांची नियुक्ती

पारनेर दूध संघाच्या अध्यक्षपदी विखे समर्थक दत्तानाना पवार यांची नियुक्ती

spot_img

पारनेर दूध संघाच्या अध्यक्षपदी विखे समर्थक दत्तानाना पवार
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील दूध उत्पादकांची कामधेनू समजल्या जाणार्‍या तालुका सहकारी दूध संघावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून संघाच्या प्रशासकीय मंडळ अध्यक्षपदी सुप्याचे माजी सरपंच दत्तानाना पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक विभागाचे विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी याबाबतचे आदेश आज काढले. दत्ता पवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे वृत्त येताच त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पारनेर तालुका सहकारी दूध संघावर नगरचे दुग्ध विभागाचे सहायक निबंधक एस. जी. गाडे यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून प्राधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, संस्थेचे कामकाज सुरू होणे आवश्यक होते आणि त्यातून दूध उत्पादकांसह संघाचे कामकाज लोकाभिमुख होण्याच्या अनुषंगाने संघाचे अवसायकास अंतरीम आदेश देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगीती दिली होती. याबाबत भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे अर्ज दिला होता.
दूध संघाचे कामकाज पाहणे आणि दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत दूध संघाचे सभासदांमधून तीन सदस्य समिती नेमणूक करण्याचे आदेश आज काढण्यात आले. त्यानुसार सुपा येथील माजी सरपंच माऊली दूध संघाचे सभासद दत्तात्रय उर्फ दत्तानाना वसंत पवार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अन्य दोन सदस्यांमध्ये भाळवणी येथील रेणुकामाता दूध संस्थेचे सभासद संदीप बाबाजी ठुबे यांची तर पानोली येथील अजिंक्यतारा दूध संस्थेचे सभासद दादाभाऊ वारे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे या आदेशात म्हटले आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले हे त्रिसदस्यीय मंडळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या अनुषंगाने कामकाज पाहणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...