spot_img
अहमदनगरपळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

spot_img

 

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना निवेदन

पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या उत्तर आदिवासी भागातील पळशी या ठिकाणी असलेल्या शासकीय आश्रम शाळेमधील मुख्याध्यापकांनी गैरकारभार चालवला आहे या संदर्भात पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे त्या संदर्भात त्यांनी आदिवासी विभागाचे आयुक्त यांना निवेदन दिले आहे. बदली न केल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
दिलेल्या निवेदनामध्ये सरपंच प्रकाश राठोड यांनी असे म्हटले आहे की शासकिय माध्यामिक आश्रमशाळा पळशी ता. पारनेर, जि. अहमदनगर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. नागरगोजे सविता कुंडलीक या शाळेवर हजर झाल्यापासून शाळेचे व्यवस्थापन बिघडले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत चाचली आहे. त्या आजपर्यंत कोणत्याही वर्गावर अध्यापन करत नाहीत, शाळेतील कर्मचाऱ्याानसोबतही त्यांचे वर्तन चांगले नाही.

आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापीका नागरगोजे मॅडम यांच्या विरुद्ध नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कारण या कधीही शाळेत वेळेवर उपस्थित नाहीत, मुख्याध्यापीका मॅडम यांच्याकडे अध्यापनासाठी इ. ९ वी व १० चे वर्ग असून गणित हा विषय आहे परंतु अद्याप पर्यंत त्यांनी या वर्गावर अध्यापन केलेले नाही. तसेच त्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्गातही उपस्थित राहत नाहीत अशी विद्यार्थी व पालकांची तक्रार आहे. आश्रम शाळेत सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य आहे. सदर आश्रम शाळेत एकूण ३२६ विद्यार्थी शिक्षण घेत असून मुली १६४ व मुले १६२ आहेत. भोजन कक्षामध्ये सडलेला भाजीपाला दिल्याचे आढळून आले आहे. तरी मुख्याध्यापीका नागरगोजे मॅडम यांची तत्काळ बदली करण्यात यावी अशी सर्व पालकांकडून मागणी करण्यात येत आहे.

त्यामुळे नागरगोजे मॅडम यांची त्वरित बदली न झाल्यास सरपंच व पालकांकडून पळशी ग्रामपंचायत कार्यालयापुढे २४/०९/२०२४ रोजी अमरण उपोषण करणार आहे. याची नोंद घ्यावी. त्यामुळे आपण त्वरित नागरगोजे मॅडम यांची बदली करावी.
अशी मागणी करणारे निवेदन पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड यांनी आदिवासी विभागाचे आयुक्त यांना राजुर येथील कार्यालयात जाऊन दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत पळशी येथील ग्रामस्थ गणेश हाके, भाऊसाहेब वारे हे उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...