spot_img
अहमदनगरजिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या सचिवपदी ऍड. विश्‍वासराव आठरे

जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या सचिवपदी ऍड. विश्‍वासराव आठरे

spot_img

जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या सचिवपदी ऍड. विश्‍वासराव आठरे
अहमदनगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्था अशी ओळख राहिलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या सचिवपदी ऍड. विश्‍वासराव आठरे यांची आज निवड करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी रा. ह. दरे यांची याआधीच निवड करण्यात आली होती. आजच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत दरे यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.


शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणार्‍या या शिक्षण संस्थेची जिल्ह्यात अनेक विद्यालये, महाविद्यालये तसेच व्यावसायिक शिक्षण देणार्‍या शाखा आहेत. संस्थेचे यापूर्वीचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष श्री. रा. ह. दरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. कार्यकारी मंडळाचा कालावधी संपल्याने आज झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत रा. ह. दरे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.


दरम्यान, संस्थेत याआधी सहसचिव म्हणून काम पाहत असलेल्या ऍड. विश्‍वासराव आठरे यांची आता सचिवपदी निवड करण्यात आली. संस्थेचे विद्यमान सचिव श्री. खानदेशे यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या उपाध्यक्षपदी ऍड. विवेक भापकर यांची निवड करण्यात आली. याशिवाय संस्थेच्या सहसचिव पदावर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ यांची तर खजिनदार पदावर ऍड. दिपलक्ष्मी म्हसे यांची निवड करण्यात आली. नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन होत असून संस्थेला शिस्त लावण्याचे मोठे आवाहन नव्या पदाधिकार्‍यांसमोर असणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर-पुणे प्रवास होणार दीड तासात; नवा रेल्वे मार्ग..

पुणे । नगर सहयाद्री:- बहुप्रतीक्षित पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्ग लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. याबाबत सविस्तर...

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....

शहर हादरलं! सरफिऱ्या पतीचे धक्कादायक कृत्य, चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळला..

Maharashtra Crime News: कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी ‘मंगळवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री –  मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...