spot_img
अहमदनगरउच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना मागविले स्पष्टीकरण; प्रकरण काय?

उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना मागविले स्पष्टीकरण; प्रकरण काय?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
स्मशानभूमीसाठी खाजगी जमिनीचा वापर करणाऱ्या महापालिकेने जमिनीची फक्त मोजणी केली पण पुढील कार्यवाही न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठाने महापालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण मागितले असून या संदर्भात येत्या 20 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकील ॲड. प्रतीक्षा छबूराव काळे यांनी दिली.

नागापूर येथील आपल्या खाजगी जमिनीचे स्मशानभूमी, दफनभूमी व मशिदीसाठी नगर महापालिकेकडून गैरवापर होत असून या संदर्भात संबंधित जमिनीच्या मालक वर्षा सोनवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठात 2014 साली ॲड. प्रतीक्षा छबूराव काळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. तेव्हा या याचिकेवर उच्च न्यायालयात 09 ऑगस्ट 2024 सुनावणी होऊन न्या. रवींद्र व्ही. घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. संबंधित जमिनीची 90 दिवसांत मोजणी करावी व सीमांकन करावे, मोजणीचा खर्च दोघांनी अर्धा अर्धा भरावा, मोजणी अहवालावर आधारित संपादन प्रक्रिया सुरू करून मोबदला द्यावा, संपादन प्रक्रिया भूसंपादन कायदा 2013 अंतर्गत राबवावी, असे आदेशात म्हटले होते.

या आदेशानंतर महापलिकेचे संबंधित जमिनीची फक्त मोजणी तीही दोनवेळा केली. परंतु मोजणी अहवाल याचिकाकर्त्यांना अद्याप दिलेला नाही. पुढील कोणीतीही कार्यवाही न केल्याने वर्षा सोनवणे यांनी ॲड. प्रतीक्षा छबूराव काळे यांच्यामार्फत खंडपीठात अवमान याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे न्यायालयात ॲड. काळे यांनी युक्तिवाद केला. तेव्हा उच्च न्यायालयाने याबाबत नगर महापालिका आयुक्तांना स्पष्टीकरण नोटीस पाठविली असून याबाबत येत्या 20 ऑगस्ट रोजी त्यावर सुनावणी ठेवली आहे, अशी माहितीही ॲ. प्रतीक्षा काळे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळूतस्करी

| देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, पळशी परिसरात वाळूतस्करांचा उच्छाद | पोलिसांच्या नाकावर टिच्चून टाकळी...

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’; आ. दाते यांच्या विजयानंत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश..

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी...

आडतेबाजारातील ‘ती’ कारवाई थांबवा; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाणे डबरा, वंजार गल्ली, तपकीर...

सरपंच, उपसरपंचाला शिवीगाळ, ग्रामस्थावर प्राणघातक हल्ला; नगर तालुक्यातील ‘या’ गावात धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याच्या कामादरम्यान सरपंच किरण साळवे...