spot_img
आर्थिकआयकर विधेयक सादर; काय होणार बदल? जाणून घ्या..

आयकर विधेयक सादर; काय होणार बदल? जाणून घ्या..

spot_img

New Income Tax Bill: अर्थसंकल्पात नवीन आयकर विधेयक सादर करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, आता संसदेत निर्मला सितारामन आज नवीन विधेयक संसदेत सादर केले आहे. या नवीन विधेयकात अनेक बदल झालेले आहेत.

करदात्यांना समजण्यासाठी सोपी भाषा या नवीन विधेयकात वापरण्यात आली आहे. नवीन विधेयकामुळे आयकर कायदा समजून घेणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे करदात्यांना कोणतीही अडचण येणार नाही.नवीन आयकर विधेयक हे १९६१ च्या आयकर कायद्याची जागा घेईन.जुन्या आयकर विधेयकात ९११ पाने आहेत. तर नवीन आयकर विधेयकात ६२२ पाने असणार आहेत.नवीन आयकर प्रणालीत कर सवलती नाही तर आयकर कायदा सुलभ करण्यात येणार आहे.

करदात्यांना आयकर कायदा समजण्यासाठी कायद्याची भाषा सोपी केली जाणार आहे. यासाठी बदल करण्यात येणार आहे. जेणेकरुन करदात्यांनी सर्व गोष्टी सहजपणे समजतील. यामध्ये वित्तीय वर्षाऐवजी (Assesment Year) कर वर्ष (Tax year) हा शब्द वापरणार आहे. नवीन विधेयक मान्य झाल्यानंतर ते १ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात येईल. या नवीन विधेयकात करदात्यांच्या सोयीसाठी सोपी भाषा वापरण्यात आली आहे.

कर नियम आणि त्यातील कलम सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागांची संख्या कमी केली आहे. नवीन विधेयकात नवीन कराचा उल्लेख कलेला नाही. नवीन विधेयक ६२२ पानांचे आहे. त्यात ५३६ कलमे आहेत. ६४ वर्षीय जुन्या आयकर कायद्यात बदल करण्यात आले आहे. २०२५ मध्ये नवीन आयकर विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आयकर कायद्यात रुपांतरित होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमध्ये उलथापालथ; उपमुख्यमंत्री पारनेरमध्ये; कोण कोण करणार प्रवेश पहा

पदाधिकार्‍यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती | सुजित झावरे पाटील यांचा शिवसेत पक्षप्रवेश पारनेर / नगर...

किरण काळे यांचे आरोप बिनबुडाचे, निराधार; जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथ्था काय म्हणाले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगरमधील जैन मंदिर ट्रस्टची जागा हडपल्याचा उबाठाचे किरण काळे यांनी केलेला...

अतिवृष्टीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा, कुठे केली पाहणी पहा

ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला सविस्तर आढावा अहिल्यानगर / नगर सह्याद्री जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या...

सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पावणेतीन लाखांचा गंडा;

माजी सैनिकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'अंतर्गत सोलर पॅनल...