spot_img
मनोरंजनअनंत अंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना काय मिळालं? 'या' अभिनेत्रीने सांगितलं सत्य...

अनंत अंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना काय मिळालं? ‘या’ अभिनेत्रीने सांगितलं सत्य…

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाह सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये संपन्न झाला. या सोहळ्यात बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली, मात्र याबाबत एक महत्त्वाची चर्चा रंगली होती.

अफवा पसरली होती की या लग्नात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे देण्यात आले होते. याबाबत अभिनेत्री अनन्या पांडेने स्पष्टता दिली आहे. तिच्या मते, “हे सर्व अफवा आहेत. कोणालाही पैसे दिले गेले नाहीत. प्रत्येकजण त्यांच्या इच्छेने उपस्थित होता.”

अनन्या पांडेने अनंतच्या लग्नाच्या वरातीत तिच्या डान्सबद्दलही भाष्य केले. तिने सांगितले की, “तो माझा मित्र आहे, आणि मी त्याच्या लग्नात मनापासून नाचले.” अनंत आणि राधिका यांचे प्रेम गोड असल्याचे तिने नमूद केले आणि त्यांच्या नात्याची प्रशंसा केली.

तिने अंबानी कुटुंबाच्या स्वागताचीही प्रशंसा केली, “फंक्शन्स कितीही मोठे असले तरी त्यांनी सर्वांचे प्रेमाने स्वागत केले. हे सर्व काही वैयक्तिक वाटते.” असे ती म्हणाली.

सध्या अनन्या तिच्या पहिल्या वेब सीरिज “कॉल मी बे”साठी चर्चेत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशीतील जातकांना लाभदायक ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य खूप अल्पसे अडथळे येतील-परंतु दिवसभरात खूप काही यश...

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...